घुग्घुस येथे कुनबी समाज भवन बनविण्यासाठी जागा द्या


घुग्घुस येथे कुनबी समाज भवन बनविण्यासाठी जागा द्या

चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष  देवराव भोंगळे यांना निवेदनातुन समाज बांधवांची मागणी

घुग्घुस(राज्य रिपोर्टर) हनिफ शेख : घुग्घुस येथील जिल्हा मध्यवर्ती बॅक समोरील जागेवरील सर्वे नं २३१ खुली जागा हि घुग्घुस येथील कुनबी समाज बांधवांना समाज भवनासाठी देण्यात यावी अशी मागणी निवेदन देऊन केली आहे.

घुग्घुस परिसरात कुनबी समाज मोठ्या प्रमाणात आहें. इतर समाजाचे स्वतंत्र भवन आहे. त्यामुळे कुनबी समाजासाठी सुद्धा हक्काचे समाज भवन असावे समाजाच्या उन्नती करीता कुनबी समाजाने एकत्रीत येऊन चर्चा विचार विनिमय करण्यासाठी कुनबी समाज भवन बनविण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बॅक समोरील जागा देण्यात यावी अशी मागणी घुग्घुस परिसरातील कुनबी समाज बांधवांनी चंद्रपुर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे यांना निवेदनातुन केली आहे.

निवेदन देतांना किसन नागरकर, महेश गुजेकर, राकेश जेनेकर व किशोर जोगी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments