बार्टीच्या विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर युवासेना शहर सचिव अक्षय खेडकर यांच्या मागणीला यश
औरंगाबाद (राज्य रिपोर्टर) : बार्टी व सारथी तसेच विद्यापीठातील इतर फेलोशिप धारकांच्या या मागणी गेल्या सहा महिन्यापासून प्रलंबित असून आज या कोरोना सारख्या महामारीच्या काळामध्ये अनेक विद्यार्थ्यांनवर स्कॉलरशिप न मिळाल्यामुळे उपासमारीची वेळ अली होती.
त्यामुळे बार्टी ,सारथी तसेच इतर फेलोशिप म्हणजे तारदूत, MPSC, UPSC ,PET या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातिल विद्यार्थ्यांना अनेक दिवसांपासून फेलोशिप मिळत नव्हती जवळपास 22075 विद्यार्थी या फेलोशिप पासून वंचीत राहिले होते त्यामुळे युवासेनेच्या माध्यमातून युवासेना शहर सचिव अक्षय खेडकर व या सर्व विद्यार्थ्यांनि कोरोनाच्या काळात जीवाची पर्वा न करता विद्यापीठ कार्यालया समोर मोठे आंदोलन केले व विद्यार्थ्यांना च्या प्रश्नाला वाचा फोडण्याचे काम केले जवळपास 3 तास कुलगुरूंना व कुलसचिव यानं घेरून विद्यार्थ्यांना चा प्रश्न 1 महिनुयाच्या आता मार्गी लागला पाहिजे असे वदवून घेतले होते तसेच माननीय मंत्री महोदय धनंजय मुंडे साहेबांना व माननीय मंत्री महोदय विजय वडेट्टीवार याना निवेदन देण्यात आली होती.
जर 1 महिन्याच्या आत फेलोशिप चा प्रश्न जर मार्गी नाही लागला नाही तर युवासेना व विद्यार्थी विद्यापीठामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा युवासेनेचे शहर सचिव अक्षय खेडकर यांनी दिला होता त्यानंतर काहीच दिवसात बार्टीच्या विद्यार्थ्यांना आज दिनांक 7 जुलै 2020 रोजी या विद्यार्थ्यांना फेलोशिप मंजूर झाली आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना मध्ये खूप आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे या आंदोलनात अक्षय खेडकर अजय पवार अमोल कर्डीले विकास थाले अमोल धनदारे कृष्णा पाटील प्रमोद तांबे अक्षय ताठे बाबुराव धनवडे आदी विद्यार्थ्यांनि आंदोलन करून यशस्वीपणे पाडले.
0 Comments