WCL ( वेकोलि ) विरुद्ध प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचा आंदोलन सुरू केले


WCL ( वेकोलि ) विरुद्ध प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांचा आंदोलन सुरू केले

नोकरीत समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही

मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन उग्र करण्याचा ईशारा

बल्लारपूर,(राज्य रिपोर्टर) : वेकोलि ने भूसंपादन करून अनेक वर्षे लोटली असुन अजुनही वेकोलिच्या कित्येक प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतल्या गेले नसून वारंवार निवेदने देऊन, लहान मोठे आंदोलन करूनही ह्या प्रकल्पग्रस्तांना अजुनही कुठलाही लाभ झालेला नसल्याने शेवटी आज प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांच्या संयमाचा बंध फुटला असुन आज सकाळी प्रकल्पग्रस्त मारोती मावलिकर, संजय बेले, विलास घटे तीन शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे.

चंद्रपूर जिल्हातील राजुरा तालुक्यातील सास्ती, भडंगपूर, कोलगाव, मानोली, धोपटाळा, माथरा ईत्यादी गावातील शेतकर्‍यांच्या जमिनी वेकोलि ने अधिग्रहित केल्या आहेत परंतु नियमाप्रमाणे अजुनही त्यातील बहुतांश शेतकर्‍यांना नोकरीत समाविष्ट करून घेण्यात आलेले नाही.

वेकोलि बल्लारपूर क्षेत्राचे महाप्रबंधक डे ह्यांना वारंवार निवेदने देऊन सुद्धा प्रशासनाकडून जाणीवपुर्वक वेळकाढूपणा करण्यात येत असुन त्यामुळे शेतकर्‍यांच्या संयमाचा बंध फुटला असुन आज ह्या शेतकर्‍यांनी आंदोलन सुरू केले आहे.

आजच्या आंदोलनातील प्रकल्पग्रस्त मारोती मावलिकर, संजय बेले, विलास घटे    टॉवर  चढून आंदोलन
सुरू केले आहे.

Post a Comment

0 Comments