E pass (प्रवास परवाना) बाबत सूचना


E pass (प्रवास परवाना) बाबत सूचना

बल्लारपूर,(राज्य रिपोर्टर) : सर्व नागरिकांना सुचित करण्यात येते की,शासन आदेशानुसार बल्लारपूर मधून इतर जिल्ह्यामध्ये प्रवास करण्यासाठी ई पास घेऊनच प्रवास करणे बंधनकारक आहे. त्याकरिता covid19.mhpolice.in या वेबसाईटवर भेट देऊन संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या fill up करावी.

Online माहिती भरत असताना पुढील गोष्टींची खबरदारी घ्यावी.

1.आधार कार्ड नुसार स्वतःचे नाव टाकावे. Clear फोटो टाकावा.

2.प्रवास करण्यासाठी जेवढा कालावधी लागतो तेवढ्यात कालावधी select करावा. त्यापेक्षा जास्त कालावधी सिलेक्ट केल्यास पास रिजेक्ट करण्यात येईल.

3 कशासाठी प्रवास करायचा आहे याचे कारण स्पष्ट नमूद करावे.

4 सध्या राहत असलेल्या ठिकाणच्या संपूर्ण पत्ता टाकावा.
विशेषतः बल्लारपूर ची स्पेलिंग व्यवस्थित टाकावे (BALLARPUR).

5.ज्या ठिकाणी जायचे आहे येथील पत्ता व्यवस्थित fill up करावा.

6. वाहनाचा प्रकार निवडताना पुढील गोष्टींची काळजी घ्यावी.चारचाकी वाहनांमध्ये एकूण फक्त तीन प्रवाशांना प्रवास करता येईल. ड्रायव्हर  आणि सोबत दोन सहप्रवासी.
या तीनही प्रवाशांची covid-19 चे लक्षण नसल्याचे सक्षम प्राधिकारी यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. 

7.कंटेनमेंट झोनमध्ये असलेल्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रवास करण्याकरता पास दिला जाणार नाही त्यांनी अर्ज सुद्धा करू नये.

8. एका व्यक्तीने एकच वेळा अर्ज करावा. एकापेक्षा जास्त वेळा अर्ज करू नये.

9.अर्ज केल्यानंतर आपणास टोकन नंबर प्राप्त होईल. टोकन नंबर प्राप्त झालेपासून 24 तासात आपल्या मोबाईल नंबर वर पास मंजूर किंवा नामंजूर(approve or reject) झाल्याचा मेसेज येईल.चोवीस तासांमध्ये कसलाही मेसेज न आल्यास नायब तहसीलदार श्री तेलंग साहेब यांच्या 9423676299 या नंबर वर टोकन नंबर मेसेज करावा.


10. ज्यांना ऑनलाईन अर्ज करता येत नाही अशा प्रवाशांसाठी तहसील कार्यालय बल्लारपूर येथे ऑनलाईन अर्ज करून देण्याची सुविधा सुरू केलेली आहे. मात्र तेथे सोशल डिस्टंसिंग चे काटेकोर पालन करावे.

Post a Comment

0 Comments