वर्धा नदीत युवकाचा मृतदेह आढळला


वर्धा नदीत युवकाचा मृतदेह आढळला

घुग्घुस,(राज्य रिपोर्टर) हनिफ शेख : आज शनिवारला सकाळी दरम्यान घुग्घुस येथुन जवळच असलेल्या घुग्घुस-मुंगोली वर्धा नदीच्या पुला जवळ नदीच्या पात्रात एका युवकाचा मृतदेह वर तरंगतांना पुलावरुन ये-जा करणारे नागरिकांना दिसला.

हि माहिती शिरपुर पोलीस स्टेशनचे सहा.पो.निरिक्षक अनिल राऊत यांना मिळताच त्यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला व शवविच्छेदनासाठी वणी तालुक्यात पाठविले.
मॄतक युवकाचे नाव अविनाश शुकलाल प्रजापती (२९) रा. वांढरी फाटा, त. जि. चंद्रपुर असे असुन मागील तिन दिवसापासुन बेपत्ता होता हत्या कि आत्महत्या हे सध्या गुलदस्त्यात आहे.



Post a Comment

0 Comments