राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरोरा तर्फे गुणवंताचा सत्कार
वरोरा,(राज्य रिपोर्टर) : राष्ट्राचे खरे वैभव आजचा प्रज्ञावान विद्यार्थी त्याच्याच गुणवत्तोर देशाची गुणवत्ता असून अशा गुणवंताना चालना व स्फुर्ती मिळावी व या देशाचा निर्भीड कर्तृत्ववान आदर्श नागरिक निर्माण व्हावा म्हणून आताच्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षा मध्ये वरोरा येतील मोहनिष,बळवंत, शेलवटकर यांनी यश प्राप्त करून तहसीलदार या पदावर नियुक्ती झाली. त्यांच्या गौरव कडून त्यांना पुढील प्रगती साठी प्रोत्साहन मिळावं या उच्छात हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वरोरा च्या वतीने वरोरा भूषण गौरवपत्र व पुस्तक भेट त्यांच्या घरी जाऊन सत्कार छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या 146 व्या जयंतीनिमित्त औचित्य साधून करण्यात आला.या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष विलासराव नेरकर, चंद्रकांत, कुंभारे , तालुकाध्यक्ष ओबीसी सेल, राजेन्द्र वरघणे , शहर अध्यक्ष सुनीता नरडे महिला शहर अध्यक्षा, अशोक सोनटक्के, बंडूजी डाखरे, योगेश लोहकरे, फारुख शेख , अकबर अली, डोसानी उपस्थित होते.



0 Comments