त्या राज्यातून येणाऱ्या बोगस बि-बियाणे पुरवणाऱ्या तस्करांवर कारवाई करा
धानोरकर दाम्पत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली मागणी
चंद्रपूर (राज्य रिपोर्टर): जिल्ह्यात माेठया प्रमाणात कापुस व सोयाबीनची पिके प्रामुख्यांने घेण्यात येते. परंतु अनेक शेतकऱ्यांचे बि-बियाणे बोगस निघल्याने ती उगवलीच नसल्याची गंभीर बाब समाेर आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली आहे. हि गंभीर बाब असून याची दाखल घेत खासदार बाळू धानोरकर आणि आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी स्वतः जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांची भेट घेऊन तेलंगणा व गुजरात या राज्यातून मोठ्या प्रमाणात बोगस बी- बियाणे आपल्या जिल्हात येत आहे. या तस्करांवर कारवाई करण्याची मागणी धानोरकर दाम्पत्यांनी यावेळी केली आहे.
धानोरकर दाम्पत्य शेतीचे जाण असलेलं व शेतकऱ्याच्या व्यथा ओळखणार दाम्पत्य म्हणून ओळखल्या जात. शेतकऱ्याचे प्रश्न हे स्वतःचे प्रश्न समजून त्याचा पाठपुरावा करून ते सोडवीत असतात. शेतकऱ्यांवर कोणीही अन्याय करीत असल्यास तो खपवून घेतल्या जाणार नाही. असे मत खासदार बाळू धानोरकर यांनी व्यक्त केले. जिल्हाधिकारी महोदयांनी देखील जातीने लक्ष देण्याची विनंती धानोरकर दाम्पत्यांनी केली.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना याबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झालेल्या असुन शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापुस या पिकांची पेरणी केलेली आहेत. परंतु कृषी केंद्राकडून घेण्यात आलेली बि-बियाणे ही बोगस असल्यामुळे ती उगवलेली नसल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे फार माेठे प्रमाणात नुकसान झालेले आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भावामुळे आधीच शेतकरी हा फार माेठ्या विवंचनेत सापडलेला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या पिकांचे सव्र्हे करून शेतकऱ्यांना शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी किंवा तात्काळ बि-बियाणे उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी देखील यावेळी या दाम्पत्यांनी केली. या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी दिली.



0 Comments