आर. आर. पाटील फाऊंडेशन तर्फे युवासेना शहर सचिव अक्षय खेडकर यांना कोरोणा वीर पुरस्कार "वीर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान पुरस्कार"प्रदान


आर. आर. पाटील फाऊंडेशन तर्फे युवासेना शहर सचिव अक्षय खेडकर यांना कोरोणा वीर पुरस्कार  "वीर छत्रपती शिवाजी महाराज सन्मान पुरस्कार"प्रदान

 औरंगाबाद, (राज्य रिपोर्टर) : संभाजीनगर येथे गेल्या अडीच महिन्यापासून अक्षय खेडकर यांनी संचारबंदी काळांमध्ये अविरतपणे शहरातील विविध भागांमध्ये जेवण वाटप व किराणा वाटप असे कार्य केले आहे त्‍याचबरोबर कामगारांचे प्रश्न असु द्या तसेच विद्यार्थ्यांच्या फीस बद्दल चे प्रश्न ,राजस्थान कोटा येथे अडकलेल्या विद्यार्थ्यांना चे प्रश्न या सर्व गोष्टींचा प्रामाणिक पणे सोडवण्यासाठी अक्षय खेडकर यांनी प्रयत्न केले व त्या प्रयत्नास यश ही मिळालं.
या कोरोनाच्या काळामध्ये आपल्या कर्तव्य निष्ठेचे पालन करुन तसेच सामाजिक दायित्व जपल्या बद्दल आर. आर. पाटील फाउंडेशन तर्फे कोरोना वीर पुरस्कार प्रदान केला गेला आहे हा पुरस्कार प्रदान करताना आर. आर. फाउंडेशनचे अध्यक्ष विनोद भैय्या पाटील तसेच सचिव अभिजित भैया देशमुख, आमदार सुमनताई आर आर पाटील यांच्या स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला 
या कार्यक्रमात  विविध क्षेत्रातून ज्यांनी-ज्यांनी संचारबंदी च्या काळात प्रेरणादायी काम केले आहे यांचाही गौरव या ठिकाणी करण्यात आला. या प्रसंगी अतिक भैय्या मोतीलाल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्ता भांगे , डाबके पाटील ,अविनाश खेडकर व इतर आर. आर. पाटील फाऊंडेशन चे पदाधिकारी उपस्थित होते.
 याप्रसंगी माननीय विनोद भैया पाटील यांनी या कोरोनाच्या कठीण  प्रसंगांमध्ये अक्षय खेडकर व शहरातील इतर कोरोना योद्ध्यांनी एक सीमेवरील वीर जवाना सारखे काम केले आहे त्यामुळे त्यांचा सन्मान करणे तसेच त्यांचा गौरव करणे हे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे, त्याच प्रमाणे अभिजीत भैय्या देशमुख यांनी ही  युवासेना शहर सचिव अक्षय खेडकर यांच्या कार्याचे कौतुक केले  असेच याप्रमाणे भविष्यातही ही आपण आपल्या कर्तव्याचे शिस्तीने पालन करून , सामाजिक दायित्व जपाल असे आम्हाला खात्री आहे 
 तसेच आपणास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो असे संबोधून सोशल डिस्टंसिंग चे पालन करून कार्यक्रम संपन्न झाला.

Post a Comment

0 Comments