राष्ट्रवादी पक्षाचा २१ वा वर्धापन दिन रक्तदान शिबिराने साजरा
बल्लारपुर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करुन २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
बल्लारपुर (राज्य रिपोर्टर) : संपूर्ण देशाला कोव्हीड १९ या विषाणू च्या महामारी ने ग्रासले असतांना राज्यात कोरोना ग्रस्तांना रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून सतत राज्याचे मुख्यमंत्री यांनी जास्तीत जास्त रक्तदान करावे असे जनतेला आवाहन केले. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा व पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी जास्तीत जास्त रक्तदान करून कोरोना बाधित रुग्णांना सहकार्य करण्याचे आवाहन केले बल्लारपुर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करुन २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा २१ वा वर्धापन दिन व २१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. समाजात जागृतता निर्माण व्हावी या उद्देशाने सतत समाजपयोगी कार्यक्रम करीत आज दिनांक २१ जुन २०२० रोजी ग्रामीण रुग्णालय बल्लारपुर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय चंद्रपुर ,राज्य रक्त संक्रमण परीषद ,महाराष्ट्र राज्य यांनी रक्तदात्यांचे रक्त संक्रमित्री केले. कोरोना कोव्हीड विषाणू या संक्रमण ला कायमचे हद्दपार करण्यासाठी २१ रक्तदात्यांनी उसुक्ता पाहुन डॉक्टर साहेब आणि त्यांच्या टीम ने रक्तदात्यांचे रक्त संक्रमित करण्यास मोलाची साथ दिली .शिबिर आयोजनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस चे शहर अध्यक्ष बादलभाऊ उराडे यांनी सर्व रक्तदाते आणि रक्तसंकलन टीम चे आभार मानले. बल्लारपुर शहरातील नागरिकांना आव्हान करण्यात आले की कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) विश्व महामारी सुरू असतांना खरीचा वाटा म्हणून व समाजा बद्दल जाणीव म्हणून अशा कठीण प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बल्लारपुर रक्तदान शिबिर आयोजित केले होते. सकाळी १० ते १२ वाजेपर्यंत रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष राजेंद्र वैद्य,राजु काबरा,राष्ट्रवादी काँग्रेस शहर अध्यक्ष बादलभाऊ ऊराडे, व पक्षाचे कार्यकर्ते यांनी रक्तदान शिबिर सफल करण्यासाठी परिश्रम घेतले.




0 Comments