बल्लारपुर तालुका क्रिडा संकुलात स्पेशल एरिया गेम्स सेंटरची निर्मिती करावी – आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी
केंद्रीय क्रिडा राज्यमंत्री किरेन रिजीजु यांचे सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन
बल्लारपुर, राज्य रिपोर्टर : बल्लारपुर शहरानजीकच्या अद्यावत तालुका क्रिडा संकुलात स्पेशल एरिया गेम्स सेंटर अर्थात खेलो इंडिया सेंटरची निर्मिती करण्याची मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भारत सरकारचे क्रिडा व युवक कल्याण राज्यमंत्री किरेन रिजीजु यांच्याकडे केली आहे.
बल्लारपुर शहरानजीक तालुका क्रिडा संकुल सर्व क्रिडा विषयक सोयीसुविधांनी सज्ज व अत्याधुनिक पध्दतीने बांधण्यात आले आहे. या तालुका क्रिडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिडा विषयक सर्व पायाभुत सुविधा उपलब्ध आहे. प्रसिध्द अभिनेते श्री. आमिर खान यांच्या हस्ते या क्रिडा संकुलाचे उद्घाटन सुध्दा झाले आहे. 2024 मध्ये होणा-या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी या जिल्हयातील खेळाडु तयार व्हावे यासाठी मिशन शक्ती हा उपक्रम चंद्रपूर जिल्हयात राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत हे अद्यावत क्रिडा संकुल तयार करण्यात आले आहे. याठिकाणी खेलो इंडिया अर्थात स्पेशल एरिया गेम्स सेंटरची निर्मिती झाल्यास त्या माध्यमातुन जिल्हयातील खेळाडुंसाठी समृध्द असे क्रिडा विषयक दालन उपलब्ध होईल अशी भुमिका आ. सुधीर मुनगंटीवार यांनी किरेन रिजीजु यांना पाठविलेल्या पत्रात नमुद केली आहे. या संदर्भात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी किरेन रिजीजु यांच्याशी दुरध्वनीद्वारे चर्चा सुध्दा केली आहे. त्यांनी या संदर्भात सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन आ. मुनगंटीवार यांना दिले आहे.



0 Comments