सोशल मीडियाच्या माध्यमातून आत्मभान अभियान घराघरात इंस्टाग्रामच्या माध्यमातून होणार कोरोना विषयक जनजागृती


सोशल मीडियाच्या माध्यमातून आत्मभान अभियान घराघरात
इंस्टाग्रामच्या माध्यमातून होणार कोरोना विषयक जनजागृती
चंद्रपूरदि. 4 जून(राज्य रिपोर्टर): जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रसार वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत महत्वपूर्ण उपाय योजना राबविल्या जात आहेत. नागरिकांना कोरोना विषाणू बद्दल सविस्तर माहिती व्हावी तसेच दैनंदिन जीवनात कशा पद्धतीने काळजी घ्यावी  व कोरोना नियंत्रण व्हावे यासाठी प्रशासनाने जनजागृती संदर्भात आत्मभान अभियान सुरू केले आहे. आत्मभान अभियानांतर्गत कोरोनाविषयी जनजागृती इंस्टाग्रामच्या माध्यमातून होणार आहे.
असे आहे आत्मभान अभियान:
सोशल मीडियापोस्टरचित्रफितीऑनलाईन स्पर्धाऑडिओगीतनागरिकांचे कोरोना विषयक सर्वेक्षण इत्यादी अनेक मार्गातून आत्मभान अभियान नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे. नागरिकांना पुढील काळामध्ये कोरोना संदर्भात जागृत करणे व प्रत्येक घरांमध्ये यासंदर्भात माहिती पोहोचविणे आवश्यक आहे. याचा प्रमुख उद्देश म्हणजे नागरिकांना सोप्या भाषेत कोरोना संदर्भात जनजागृती व्हावी. आत्मभान अभियान मध्ये स्वयंप्रेरणेने विनामूल्य योगदान देणारे कलाकार तसेच काही क्षेत्रातील नामवंत सुद्धा यामध्ये भाग घेत आहे.
इंस्टाग्रामच्या माध्यमातून जनजागृती:
जिल्ह्यातील नागरिकांना साध्या सोप्या भाषेत कोरोना विषयक जनजागृती होण्यासाठी आत्मभान अभियान आता इंस्टाग्रामच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोचणार आहे. आत्मभान अभियाना अंतर्गत विविध जनजागृती विषयक माहितीव्हिडिओपोस्टरबॅनरमाहितीपत्रके हे सर्व जिल्हा प्रशासनाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर मिळणार आहे. collector.chanda हि इंस्टाग्राम युजर आयडी वापरून आत्मभान अभियानाची सविस्तर माहिती मिळणार आहे.
जनजागृती विषयक माहितीसाठी collector.chanda या इंस्टाग्राम युजर आयडीचा वापर करुन आत्मभान अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments