इरई नदिवरील पुलाचे बांधकाम पावसाळयापूर्वी पुर्ण करा, यंग चांदा ब्रिगेडची मागणी
सार्वजनीक बांधकाम विभागाच्या मुख्य अधिक्षक अभियतांना निवेदन
चंद्रपुर,(राज्य रिपोर्टर) : दाताळा मार्गावर सुरु असलेले पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरु आहे. परिणामी नागरिकांना रहदारी करतांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. विज धोक्यात घालून नागरिक या मार्गाने प्रवास करीत असून येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हि बाब लक्षात घेता पावसाळयाआधी या पुलाच्या निर्मीतीचे काम पुर्ण करण्यात यावे अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली असून सदर मागणीचे निवेदन सार्वनजीक बांधकाम विभागाचे मुख्य अधिक्षक अभियंता यांना यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आले आहे.
६१ कोटी ६९ लक्ष ६२ हजार ७८६ रुपये खर्च करून दाताळा मार्गावरील अत्याधूनीक पुलाचे बांधकाम केल्या जात आहे. दोन वर्षापासुन या पुलाच्या निर्मीतीचे काम सुरु असले तरी ते अद्यापतरी पूर्ण झालेले नाही. मागील वर्षी या पुलाचे बांधकाम सुरु असताना नागरिकांना ये- जा करण्याकरिता नदी पात्रातून कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. परंतु रस्ता पहिल्याच पावसात वाहून गेल्याने दाताळा व लगतच्या गावाचा संपर्क चंद्रपूर शहराशी तुटला गेला. दुध, भाजीपाला व अन्य व्यवसाय करण्याकरिता ग्रामस्थांना याच मार्गावरुन शहराकडे यावे लागते परंतु रस्ताच नसल्याने त्यांचा व्यवसाय ही चांगलाच प्रभावित झाला आहे.
चंद्रपूर ते दाताळा या मार्गावर अनेक नामवंत शाळा असल्याने शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना सुद्धा याचा मोठा त्रास सहन करावा लागला आहे. इतकेच नव्हे तर शहरातील नामवंत मंगल कार्यालय, लाँन सुद्धा याच परिसरात आहे परंतु पुलाचे बांधकाम सुरु असल्याने या मार्गाने ये-जा करण्यास अडचणी येत आहे. परंतु याकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी करुन पावसाळया पूर्वी या पुलाचे बांधकाम पुर्ण करा अशी मागणी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. यावेळी राहुल मोहुर्ले, रुपेश कुन्दोजवार, संदीप कष्टी, आदिंची उपस्थिती होती.



0 Comments