शेतकऱ्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे सन्मान द्या : खासदार बाळू धानोरकर


शेतकऱ्यांना कुटुंबातील सदस्याप्रमाणे सन्मान द्या  : खासदार बाळू धानोरकर 

कृषी उपन्न बाजार समिती चंद्रपूर येथील अत्याधुनिक शेतकरी निवासाचे लोकार्पण 

चंद्रपूर (राज्य रिपोर्टर): शेतकरी आपल्या समाजातील मुख्य घटक आहे. परंतु समाजात त्यांना दुय्यम वागणूक दिल्या जाते. शासकीय कार्यालय, बँक व इतर ठिकाणी त्यांच्या कामांना प्रार्थमिकता दिली जात नाही. परंतु आता शेतकऱ्यांना कुटुंबातील सदस्या प्रमाणे सन्मान झाला पाहिजे. त्यांचे प्रश्न सोडविणे हेच आपले प्राधान्य असले पाहिजे असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते कृषी उपन्न बाजार समिती चंद्रपूर येथील शेतकरी निवासाचे लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलतात होत. 
यावेळी  यावेळी सभापती दिनेश चोखारे, उपसभापती रणजित डवरे, कॉग्रेस नेते विनोद दत्तात्रय, रामू तिवारी, महेश मेंढे, चंद्रकांत गुरु, सुभाष गौर,  कॉंग्रेस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष ऍड. मल्लक शाकीर, अशोक मत्ते,  नगरसेविका सुनीता लोढीया, अस्विनी खोब्रागडे, अनुताई दहगावकर, राजेश अडूर, पप्पू सिद्धीकी, कुणाल चहारे, नागेश बोडे, गोविंदा पोडे, अरविंदजी चवरे, विजय टोंगे, सुनील फळकाळे, पवन अकतारी, नामदेव जुनघरे, रोशन पचारे, शंकर खैरे, कवडू दिवसे, रमेश बुचे यांची उपस्थिती होती.  
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, कृषी उत्पन्न बाजार समिती हि शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहे. बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचे कार्य झाले पाहिजे, चंद्रपूर येथील कृषी उपन्न बाजार समिती मध्ये अत्याधुनिक शेतकरी निवास बांधले आहे. त्याच्या लाभ शेतकरी बांधवाला मिळाला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments