शेगाव येथे आज कोरोना योद्धा पोलिस, डॉक्टर , सामाजिक कार्यकर्ते यांचा सत्कार



शेगाव  येथे आज कोरोना योद्धा पोलिस, डॉक्टर , सामाजिक कार्यकर्ते  यांचा सत्कार .

म रा मराठी पत्रकार संघाचा   उपक्रम ..

चंद्रपूर,(राज्य रिपोर्टर) : वरोरा  तालुक्यातील शेगाव (बु )येथे आज महारष्ट्र राज्य मराठी पत्रकार  संघ शाखा शेगाव च्या वतीने कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्या करिता  स्थानिक शेगाव येथील पोलिस तसेच पोलिस कर्मच्यारी , सरपंच , सामाजिक कार्यकर्ते , तसेच आशा वर्कर्स  याशिवाय  शासकीय सेवा देणारे वैद्यकीय अधिकारी , यांचा आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अधिक मोलाचे कार्य करणाऱ्या योद्धांचा  महाराष्ट राज्य मराठी पत्रकार संघांचे वतीने शाल श्रीफल पुष्पगुच्छ , सन्मान चिन्ह , सन्मानपत्र देऊन यांना गौरविण्यात आले।  

                सदर यमधे  आपल्या जीवाची पर्वा न करता सदैव जनतेची रक्षण करुण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर  जनतेची सेवा करणारे येथील ठानेदार श्री सुधीर बोरकुटे , व त्यांचेे सहकारी पोलिस अधिकारी श्री प्रवीण जाधव  ,  यांना यावेळी गौरविण्यात आले ,   तसेच येथील  वैद्यकीय अधिकारी डॉ. हिवरकर मैडम , नर्स सौ साखरे मैडम यांचा सत्कार करुण त्यांचे  अभिनंदन करून पुढील काया॔च्या सुभेच्छा दिल्या. 

             इतकेच नव्हे तर गावकऱ्यांच्या हिता साठी  जनतेचे रक्षण करणारे शेगाव चे प्रथम नागरिक श्री यशवंत राव लोडे , सरपंच ग्रामपंचयायत शेगाव बु  यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला याच सोबत येथील सामाजिक कार्यकर्ते तसेच टाइगर ग्रुप चंद्रपुर चे प्रमुख श्री अनिल भाऊ जाधव  यांनी कोरोना युद्धात जनतेची सेवा केली.  तर   मजूरवर्ग , गरीब जनता , यांना त्यांच्या घरापर्यंत भोजना सह किराना अनाज सुद्धा त्यांनी पठावल्याने त्यांचा सद्धा यावेळी सत्कार करण्यात आला .  याच सोबत येथील प्रतिष्ठीत व्यापारी    श्री  मनोज राव बोनदगुलवार , व श्री बंडू भाऊ कोटकर यांनी अप्रत्यक्ष् रित्या गोर गरीब जनतेला सर्व  सोई पुरवल्या शिवाय त्यांच्या घरा पर्यन्त अनाज, किराना भाजीपाला सुद्धा पुरविला व जनतेची सेवा केली  व  येथील  आशा वर्कर्स महिलांनी सुद्धा गावात अनेक मोलाचे कार्य करुण जनतेसाठी काम केले.अशा प्रकारे उत्कृष्ठ कामगिरी करणारे  कोरोना योद्धा महिला ,पुरुष यांचा संयुक्त रित्या   यांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार करण्यात आला तर यावेळी प्रत्येक कोरोना योद्धा ला शाल , सन्मान चिन्ह , पुष्प गुच्छ ,  सन्मानपत्र , व सुभेच्छा देऊन त्यांना गौरविन्यात आले  यावेळी  महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष्य , प्रा.महेश पानसे ,  जिल्हाध्यक्ष श्री सुनील बोकडे , जिल्हाकार्याध्यक्ष श्री जीतू चोरडिया ,   तसेच   जिल्हा सरचिटणीस  श्री राजू कुकडे   ,   प्रा श्री  धनराज खानोरकर व  वरोरा तालुका पत्रकार श्री प्रदीप कोहपरे आदि मान्यवर हजर होते .सदर ह कार्यक्रम येथील शाखा अध्यक्ष्य श्री मनोज गा ठ ले  , यांच्या मार्गदर्शनात पार पडला व कार्यक्रमच्या यशस्विते साठी  संगटनेचे सचिव श्री देवराव ढोके  यांनी मोलाचे सहकार्य केले.

Post a Comment

0 Comments