जीवावर उदार होऊन पोस्टमनही देताहेत सेवा---चंदनसिंह चंदेल


जीवावर उदार होऊन पोस्टमनही देताहेत सेवा---चंदनसिंह चंदेल

लोकनेते आ.मुनगंटीवार तर्फे पोस्टमनला सुरक्षा किटचे वितरण

भारतीय जनता पार्टी चंद्रपुर जिल्हा शाखेचा  उपक्रम

बल्लारपुर,(राज्य रिपोर्टर) : कोविड १९ या महामारीचे संकट अजून टळले नाही.लोकांना आता अधिक सावध होऊन व्यवहार करायचे आहे.कोरोना विषाणूचा संसर्ग,केव्हा कुठं व कसा होईल सांगता येत नाही.असे असताना पोस्टमन , इतर अधिकारी व कर्मचारी निरंतर सेवा देत आहेत.पोस्टमन तर प्रतिबंधित क्षेत्रात जाऊन काम करीत आहेत.डॉक्टर्स,पोलीस,पत्रकार यांचे प्रमाणे पोस्टमनही जीवावर उदार होऊन सेवा देत आहेत,असे प्रतिपादन भाजपा जेष्ठनेते चंदनसिंह चंदेल यांनी केले.ते बल्लारपूर मुख्य पोस्ट ऑफिस येथे आज (२जून)मंगळवार ला भारतीय जनता पार्टी चंद्रपुर जिल्हा तर्फे नियोजित पोस्टमन सुरक्षा किट वितरण उपक्रमा प्रसंगी बोलत होते.

यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष व नगराध्यक्ष हरीश शर्मा,मनपा नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार,भाजपा शहर अध्यक्ष काशीसिंह,भाजयुमो अध्यक्ष रनंजयसिंह,डॉ मंगेश गुलवाडे,प्रज्वलन्त कडू,अमीन शेख,वरिष्ठ पोस्ट मास्टर राजेंद्र आक्केवार,रमा देवराज,प्रशांत विघ्नेश्वर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
चंदनसिंह चंदेल म्हणाले,पोस्टमन दैनंदिन विविध कामे करताना,कोरोनाच्या युद्धात लोकांना औषध व गरजू-गरीब जनतेला जनधन योजनेचे पैसे  घरपोच देत आहेत.पोस्टमनला कधीही संसर्ग होवू शकतो म्हणून लोकनेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सुरक्षा किट उपलब्ध करून दिली आहे,याचा वापर करून आपल्यासह परिवाराला सुरक्षित ठेवा,असे आवाहन त्यांनी केले.यावेळी आ.मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतील सुरक्षा किट मान्यवरांच्या हस्ते सर्व पोस्टमन व कर्मचाऱ्यानां प्रदान करण्यात आली.या किट मध्ये सॅनिटायझर,मास्क,पांढरा पंचा,बिस्कीट पॅकेट व साबणांचा चा समावेश आहे.
यावेळी हरीश शर्मा यांनी उपस्थितांना आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या कोरोना संकटातील लोकसेवेची माहिती दिली. आ.मुनगंटीवार जनतेच्या पाठीशी खंभीरपणे उभे असल्यानेच सर्व वर्गाला मदतीचा हात देणे शक्य होत आहे.पोलिसांना सुरक्षा किट,डॉक्टर्सला पीपीई किट,गरजूंना धान्य किट,निःशुल्क रुग्णवाहिका सेवा असे अनेक प्रकल्प कोरोनाच्या संकटात लोकनेते आ. मुनगंटीवार यांनी सुरू ठेवले आहेत,असे ते म्हणाले.यावेळी कासनगोट्टूवार,डॉ मंगेश गुलवाडे,काशीसिंह यांनी समयोचित मार्गदर्शन केले.बल्लारपूर पेपरमिल येथील पोस्ट ऑफिसमधे ही पोस्टमन सुरक्षा किट वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्रशांत विघ्नेश्वर यांनी केले.वरिष्ठ पोस्ट मास्टर आक्केवार यांनी आभार मानले.
यावेळी पोस्ट कर्मचारी जकीर शेख,अशोक घोडमारे, वसंता हिंगे,नितीन शेंडे,आर.जी कपूर,जी.के वाढई,जी एस कदम ,एस वी शास्त्रकार आदींची प्रामुख्याने उपस्थिती  होती.यशस्वीतेसाठी प्रकाश धारणे,दत्तप्रसंन्न महादानी, सूरज पेदुलवार,श्रद्धा विघ्नेश्वर यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments