नगर परिषदचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांची ' बदली नव्हे ! तर, निलबन करा ' - तुलसीदास अलाम
ब्रम्हपूरी नगर परिषदेच्या मुख्यधिकाऱ्यांमुळे आदिवासीत दहशतीचे सावट !
चंद्रपूर, ब्रह्मपुरी (राज्य रिपोर्टर) : कोवीड-19 च्या काळात आदिवासीवर सातत्याने अन्याय वाढत असल्याचा आरोप अखिल भारतीय गोंडवाना पार्टी महाराष्ट्र राज्य चंद्रपूर जिल्हाध्यक्ष तुलसीदास अलाम यांनी केला असून,
ब्रम्हपूरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी दि. 20/5/2020 रोजी आदिवासी जमातीतील गोंड धर्मीय समाजाचा धार्मिक ध्वज कापून नेला. आदिवासी समाजाच्या ध्वजाची विटबना केल्यामुळे आदिवासी समाजात तिव्र रोष निर्माण झाला असून नगर परिषदचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांची बदली नव्हे ! तर, निलबन करण्याचे आवाहन मा. पालकमंत्री विजयभाऊ वडेटीवार यांना करण्यात आले आहे.
ब्रम्हपूरी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांच्या कृतीचे निषेद निवेदन देताना आदिवासी समाजावर हा प्रशासनीक अन्याय असून न्याय घावा अशी मागणी अखिल भारतीय गोंडवाना पार्टीचे जिल्हाध्यक्ष तुलसीदास अलाम यांनी केली आहे.
विघमान तहसिलदार वरोरा यांच्या मार्फत मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदन देताना अखिल भारतीय गोंडवाना पार्टी चंद्रपूर जिल्हयाध्यक्षासह, अमोल मडावी, शंकर कुळसंगे, हनुमंत सिडाम, नितीन आत्राम, शुभम वरखडे यांच्या माध्यमातून लक्ष वेधताना म्हटले की, कोवीड-19च्या काळात आदिवासीवर सातत्याने अन्याय वाढत असून, असे अन्याय कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतल्या जाणार नाहीत. आदिवासीवर अन्यायाबाबत कोवीड-19 च्या काळात उदाहरण घालून देताना चंद्रपूर येथील जलनगर येथे वास्तव्यास असलेल्या आदिवासीवर गुन्हे दाखल झालेत. इंदिरा नगर येथील आदिवासी समाजाच्या पेन ठाण्याची जागा हडपण्याचा प्रकार व पोलीस तक्रारी, नुकतेच ब्रम्हपूरीच्या नगर परिषदेचे मुख्याधिकऱ्यांनी व त्याच्या सहकार्यानी केलेली ध्वजाची विटबना, यामुळे जनतेमध्ये राज्य सरकारच्या अख्यत्यारित असलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चुकीचा संदेश जात आहे.
आदिवासी समाज आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे नगर परिषदचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांची ' बदली नव्हे ! तर, निलबन करा ' व ध्वज अवमान प्रकरणी, आदिवासी समाजावर अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदयाचा गैरवापर प्रकरनी, आदिवासी समाजाला चिथावणीखोर कृत्य करण्यास बाध्य केल्याबाबत गुन्हे दाखल करा.
कोवीड-19 संचारबंदी व आपत्ती व्यवस्थापन कायदयाचा गैरफायदा घेवून आदिवासी समाजाच्या भावनांना ठेच पोहचविणाऱ्या मंगेश वासेकर या अधिकाऱ्यावर निलबन करून कडक कारवाई करा, अन्यथा अखिल भारतीय गोंडवाना पार्टी महाराष्ट्र राज्य यांना मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी मनमा नी करणाऱ्या नगर परिषदचे मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना वठणीवर आणण्यासाठी व लोकशाही मार्गाने न्याय मिळवून घेण्यासाठी जनआंदोलनाची परवानगी घा ! अशी मागणी करून आदिवासीमध्ये प्रशासनिक दहशत निर्माण करणाऱ्या ब्रम्हपूरी चे मंगेश वासेकर यांचे निलबन करून कडक कारवाई करण्यातयावी या करिता निषेध निवेदन सादर करण्यात आले.



0 Comments