म.रा.म.प.संघ शाखा - ब्रम्हपुरीतर्फे कोरोना योद्धाचा सत्कार


म.रा.म.प.संघ शाखा - ब्रम्हपुरीतर्फे कोरोना योद्धाचा सत्कार

ब्रम्हपुरी,(राज्य रिपोर्टर) : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा ब्रम्हपुरी यांच्या वतीने सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीच्या लढाईत निर्भीडपणे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता इतरांच्या आरोग्याची काळजी घेत तोंडाला मास्क वापरून व हातात स्वच्छतेचा झाडू धरून ब्रम्हपुरी नगरपरिषदे मध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती गौरीबाई शंकर शेंदरे यांचा सत्कार शाल व श्रीफळ देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष म.रा.म.प.संघ चंद्रपुर जिल्हा उपाध्यक्ष प्रा.डॉ.धनराज खानोरकर,ब्रम्हपुरी शाखेचे अध्यक्ष प्रा.डॉ.रवी रणदिवे,कार्याध्यक्ष प्रा.संजय लांबे यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आले.या प्रसंगी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ शाखा ब्रम्हपुरी संघाचे पदाधिकारी श्री गुरुदेव अलोने, प्रशांत राऊत,अमरदीप लोखंडे ,मधुकर मेश्राम , चंद्रशेखर सातव ,प्रदीप बिंजवे उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ब्रम्हपुरी शाखेचे उपाध्यक्ष राहुल मैंद तर शाखेचे सचिव नांदुभाऊ गुड्डेवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments