सेक्स रैकेट चालत असलेल्या घरावर छापा
रामनगर पोलीस गुन्हे शाखेची कार्यवाही तीन आरोपींना अटक
९०,००० रुपयांचा मुद्देमाल वाहन व मोबाईल जप्त
चंद्रपूर,(राज्य रिपोर्टर) : चंद्रपूर शहातील दाताळा रोड वरील एका घरात काही दिवसांपासून सेक्स रॅकेट सुरू होते. या ठिकाणी सेक्स शौकीनांची मोठी गर्दी होत असल्याने गुप्त माहिती सोमवार दिनांक 8 जून 2020 रोजी सायंकाळी अंदाजे 7 वाजता रामनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शाखेने धाड टाकून नागपूर येथील देह विक्रीसाठी आणलेल्या एका तरुणीसह, आरोपी सरला नगराळे वय 50 वर्ष या महिलेला व दलाल शेख इरफान शेख अहमद वय 26 वर्ष राहणार जल नगर चंद्रपुर, या तिघांना अटक करण्यात आली आहे.
रामनगर पोलिसांना या सेक्स रॅकेट बाबत माहिती मिळाली होती त्या माहितीच्या आधारे रामनगर पोलिसांनी काल रात्रीच्या सुमारास त्या सेक्स रैकेट चालत असलेल्या घरावर छापा टाकला. यावेळी तेथे एक युवती, महिला आणि दलाल आढळून आले. या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांचा कडून रोख रकमेसह अंदाजे ९०,००० रुपयांचा मुद्देमाल वाहन व मोबाईल जप्त केला असल्याची माहिती असून या प्रकरणात महत्वाची बाब म्हणजे सेक्स रैकेट मधील युवती नागपूर येथील असल्याची माहिती मिळाली आहे, त्यामुळे लॉकडाउनच्या काळात जिल्ह्याच्या सीमा सील असताना नागपूरची युवती देहविक्री व्यवसाय करण्यासाठी नेमकी चंद्रपुरात आली कशी? हा प्रश्न गंभीर असून पोलिस तपासात नेमकी काय माहिती समोर येते याकडे त्या परिसरातील जनतेचे लक्ष लागले आहे.
नागपूरची तरुणी चंद्रपूरात कशा प्रकारे आणण्यात आली याची सखोल चौकशी पोलीस करीत आहेत. सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी शीलवंत नांदेडकर यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक शेवाळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार ,मलिक, संदीप कापडे सह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी केली आहे.




0 Comments