बल्लारपुर तालुक्यातील रास्त भाव दुकानदाराचे विविध मागण्यासंदर्भात पालकमंत्री यांना निवेदन : समस्याची सोडवणूक करण्याची मागणी
बल्लारपुर तालुक्यातील रास्त दुकानदार संपावर : राज्यातील रास्त दुकानदाराच्या संपाला समर्थन
बल्लारपुर,(राज्य रिपोर्टर)दिपक भगत : महाराष्ट्र राज्यातील रास्त भाव दुकानदार व विदर्भ रास्त भाव दुकानदार यांनी 1 जून 2020 पासून संप पुकारला आहे या संदर्भात बल्लारपुर तालुक्यातील रास्त भाव दुकानदारानी आपल्या विविध मागण्या संदर्भात चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री व बहुजन कल्याण मंत्री ना. विजयभाऊ वडेटटीवार यांना आपले निवेदन सादर करून समस्याची सोडवणूक करण्याची मागणी केली आहे.
बल्लारपुर तालुक्यातील रास्त भाव दुकानदाराच्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोरोनाच्या रोगामुळे 5 रास्त भाव दुकानदाराना आपल्या प्राणाला मुकावे लागले तसेच अनेक रास्त भाव दुकानदार कोरोना मुळे आजारी पड़त आहे त्यामुळे त्यांना इतरांच्या प्रमाणे 50 लाख रु चे विमा कवच देण्यात यावे, प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेच्या मोफत धान्य वाटपाचे कमीशन देण्यात यावे, रास्त भाव दुकानदाराला कामाच्या आधारे मानधन देण्यात यावे, ई पास मशीन ही अनेक रास्त भाव दुकानदाराच्या सहाय करीत नाही त्यामुळे यासम्बंधी दुकानदार व ग्राहक यांना नेहमी त्रास सहन करावा लागतो धान्य वाटपामध्ये अळथळा निर्माण होतो त्यामुळे ई पास मशीन संदर्भत कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, दुकानदाराला गावगुंडा करून होणाऱ्या तक्रारी व समाजसेवक इत्राकडून होणारी मारहाण खोट्या तक्रारी थाम्बवन्यत याव्यात या अनुषंगाने रास्त भाव दुकानदाराच्या विविध मागण्या संदर्भात संघटनेच्या संपाला पाठिम्बा देवून आणखी जवळपास 1 जून 2020 पासून संपावर जात आहे. तरी या सर्व मागन्याचा विचार करून योग्य निर्णय घेवून मागण्या मान्य करन्या संदर्भात आपण प्रयत्न करावा अशी अपेक्षा बल्लारपुर तालुक्यातील रास्त भाव दुकानदारानी केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील रास्त भाव दुकानदार आपल्या मागण्यासाठी 1 जून पासून राज्यभरात संप पुकारित आहेत त्यानी आपल्या मागण्या शासनाकडे सादर केल्या असून राज्यभरात होत असलेल्या रास्त भाव दुकानदाराच्या संपाला बल्लारपुर शहर व तालुक्यातील रास्त भाव दुकानदाराचे समर्थन असून व या संबंधिचे निवेदन शासनाला रास्त भाव दुकानदार संघटनेच्या माध्यमातुन देण्यात आले व मागण्या मान्य होईपर्यन्त आम्ही पण संघटनेसोबत संपावर जावू अशा प्रकारचे निवेदन रास्त भाव दुकानदार संघटना बल्लारपुर च्या वतीने तहसील कार्यालय बल्लारपुर येथे देण्यात आले यावेळी निवेदन देताना अध्यक्ष भास्करभाऊ माकोड़े, सचिव हेमंत मानकर ई ची उपस्थिति होती.





0 Comments