‘कोरोना योद्धा’ चा पत्रकार संघातर्फे सत्कार


‘कोरोना योद्धा’ चा पत्रकार संघातर्फे सत्कार

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुल तालुका शाखेतर्फे तहसिलदार , पोलीस निरीक्षक , उपजिल्हा रुग्णालयचे अधिक्षक , संवर्ग विकास अधिकारी , मुख्याधिकारी शाल, श्रीफळ आणि रोपट देउन सत्कार करण्यात आला.


चंद्रपूर,मुल (राज्य रिपोर्टर) : संपूर्ण देशात कोरोना आजाराचा झपाट्याने फैलाव होत असून दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे.या आजाराला आळा घालण्यासाठी पोलिस,डाॅक्टर्स,परिचारिका,सफाई कामगार व विविध विभागांचे अधिकारी जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत आहेत.याच उदात्त भावनेतून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ,मुंबईच्या मुल तालुका शाखेतर्फे तहसिलदार श्री. ढुमनसिंह जाधव, पोलीस निरीक्षक श्री. सतीशसिंह राजपुत, उपजिल्हा रुग्णालयचे अधिक्षक डाॅ. सुर्यकांत बाबर, संवर्ग विकास अधिकारी श्री. कपिल कलोडे, मुख्याधिकारी श्री. विजयकुमार सरनाईक, डाॅ. तिरथ उराडे, डाॅ. उज्वल इंदुरकर यांचा नुकताच शाल, श्रीफळ आणि रोपट देउन सत्कार करण्यात आला.
     पत्रकार संघाच्या मुल तालुका शाखेचे अध्यक्ष सतीश आकुलवार, सरचिटणीस मनिष रक्षमवार, उपाध्यक्ष मनोज झांबरे, मंगेश नागोश, गौरव पराते, आशिष ब-हेवार यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन ‘कोरोना योद्धां’ चा सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments