कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्ष रहावे व मॉस्कचा वापर करावा - विपिन मुद्दा मुख्याधिकारी बल्लारपुर


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्ष रहावे व मॉस्कचा वापर करावा - विपिन मुद्दा मुख्याधिकारी बल्लारपुर      
     
    बल्लारपुर(राज्य रिपोर्टर) :कोरोना या विषाणुजन्य आजाराने भारत देशा सह जगातील जनजीवनावर मोठा प्रभाव पडला आहे तसेच कोरोना महामारीच्या संदर्भात बल्लारपुर वासियानी दक्षता घेणे गरजेचे आहे बल्लारपुर शहर हे मिनी इंडिया म्हणून प्रचलित असल्यामुळे देशाच्या विविध भागात आपल्या उपजीवीकेसाठी गेलेले व आपल्या मूळ गावी परतत असलेले नागरिकानी दक्षता घेणे गरजेचे आहे.
 चंद्रपुर जिल्ह्यातील बल्लारपुर हे कोरोना हॉटस्पॉट होवू शकते असा अंदाज वर्तविल्या जात आहे या अनुषंगाने नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी मॉस्कचा वापर करावा, अन्यथा दंड आकारण्यत येईल, अत्यावश्यक नसल्यास नागरिकांनी घराबाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी नागरिकांनी जावू नये, परजिल्ह्यातून वा परराज्यातुन आलेल्या व्यक्तीनी संस्थात्मक विलगिकरनात रहावे, घरगुती विलगिकरण केलेल्या व्यक्तीनी आणि कुटुंबियांनी घराबाहेर पडू नये आणि प्रवाशी व्यक्तीच्या संपर्क मध्ये येवू नये. त्यामुळे सर्वच व्यक्तीनी दक्षता बाळगावी, सतर्क राहून नियमाचे पालन करावे तसेच आपल्या परिसरात कुणीही बाहेरुन आलेल्या नागरिकांची माहिती प्रशासनाला द्यावी जेणेकरून वेळीच उपाययोजना करून बल्लारपुर शहराला कोरोनापासुन नियंत्रित ठेवता येईल असे आवाहन मा.विपिन मुद्दा मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपुर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments