कावीळग्रस्त वॉर्डात वॉटर एटीएम उपलब्ध करा : आ. प्रतिभा धानोरकर
वरोरा, (राज्य रिपोर्टर) : येथील नेताजी नगर चिरघर वॉर्ड येथे नगरपालिका पाईपलाईन फुटल्याने दूषित पाणीपुरवठा होत असल्याने ३२ लोकांना काविळीची लागण झाली. हि बाब अत्यंत गंभीर असून उपाययोजना त्वरित करीत कावीळग्रस्त वॉर्डात वॉटर एटीएम उपलब्ध करा असे निर्देश आमदार प्रतिभा धानोरकर यांनी मुख्याधिकारी यांना दिले.
आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यावेळी प्रत्यक्ष वॉर्डात जाऊन आजारग्रस्तांची विचारपूस केली. यावेळी वॉर्डात निर्जंतुकीकरणं करून शुद्ध पाणी उपलब्ध करणे. २४ तास वॉर्डात वैद्यकीय चमू हजर ठेवणे आणि शुद्ध पाणी पुरवठ्याकरिता वॉटर एटीएम व नगरपरिषद कडून आजारग्रस्तना आर्थिक मदत त्वरित करण्याचे निर्देश आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दिले, यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी बल्लाळ, विलास टिपले , राजू महाजन , प.स. सभापती धोपटे, संजीवनी भोयर नगरसेविका चौधरी, चिमुरकर , राखी काळबानदे , मोनू चिमुरकर , पंकज नाशिककर , मनोहर स्वामी , गजानन मेश्राम निलेश भालेराव व काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते



0 Comments