राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आरोप वैद्यकीय प्रवेशामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय


राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आरोप
वैद्यकीय प्रवेशामध्ये ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय

      राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा आरोप.
    तहसीलदार यांना निवेदन.
वरोरा, ता.बा.(राज्य रिपोर्टर) :  इतर मागासवर्गीय ओबीसी विध्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेण्यापासून केंद्र सरकार वंचित ठेवत आहे.ओबीसींना  27% टक्के आरक्षणाची तरतूद असतांना सन  2020-21 या शैक्षणिक सत्रात केंद्रीय पदवीत्तर कोट्यात  केवळ 3.8% टक्केच  आरक्षण ठेवण्यात आले आहे.त्यामुळे केंद्र सरकार व्दारे ओबीसी विद्यार्थ्यांवर अन्याय करत असल्याचा आरोप ओबीसी बांधवा तर्फ करण्यात येत आहे. ओबीसींना शिक्षणात 27% टक्के आरक्षण असतांना, देशभरात वैद्यकीय प्रवेशासाठी 66, 333 जागा मधून 15% टक्के जागा म्हणजे 9950 जागा केंद्रीय कोट्यात आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. या कोट्यात ओबीसी विध्यार्थ्यांच्या वाटयाला 27% टक्के आरक्षणा नुसार 2578 जागा येणे अपेक्षित होत्या, परंतु केवळ 371 जागा म्हणजे 3.8% टक्केच आरक्षण मिळाले आहे,  अनुसूचित जातीतील विध्यार्थ्यांना  1,385 जागा (15%) अनु जमातीतील विध्यार्थ्यांना  669 जागा  (7.5%) त्यांना नियमानुसार दिल्या गेल्या,व  खुल्या प्रवर्गातील विध्यार्थ्यांना मात्र तब्बल 7125 जागा देण्यात आल्या, या प्रकाराने ओबीसी विध्यार्थ्यांना डावलण्यात आले आहे.केंद्र सरकार कडून सातत्याने ओबीसी समाजावर  अन्याय होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वैद्यकीय समिती  कडून होणाऱ्या अन्यायाविरोधी भूमिके बद्दल ओबीसी संघटना मधून संताप व्यक्त होत आहे.
         अन्य समाजाप्रमाणेच  ओबीसींना आरक्षण देण्याची मागणी करण्याचे निवेदन राष्ट्रीय ओबीसी महासंघ शाखा वरोरा चे वतीने मा तहसीलदार गोसावी तहसील कार्यालय  वरोरा मार्फत  मा.पंतप्रधान यांना पाठविण्यात आले आहे
.तहसीलदार  गोसावी यांना निवेदन देतांना मा. मोरेश्वरराव टेंमुर्डे साहेब माजी उपसभापती विधानसभा मुंबई, यांचे नेतृत्वात व मा. अॅड प्रदीप बुरान नगरसेवक , मा .अॅड जयंत ठाकरे, प्रा. अशोक पोफळे, प्रा सुरेश बुरान, प्रा. वसंत माणूसमारे, प्रा. रुपलाल कावळे , प्रा. संबाजी गारघाटे, श्री.पुंडलिक कौरासे, श्री अरुण ढोके, श्री.धनराज विरुटकर, श्री. अक्षय पोफळे श्री. श्याम लेडे, श्री. अशोक टिपले, श्री भास्कर कुडे, श्री.राजू हिवंज श्री.विजय वासाडे, यांचे उपस्थितीत देण्यात आले.
 ओबीसी ना जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत ओबीसी चा आरक्षणाचा लढा सरकार विरुद्ध सुरूच राहील अशी प्रतिक्रिया अँड. मोरेश्वर टेमुर्डे ,शाम लेडे यांनी व्यक्त केल्या.

Post a Comment

0 Comments