कोरोना संदर्भाने प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्याचे अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना - जिल्हाधिकारी चंद्रपुर
बल्लारपुर,(राज्य रिपोर्टर)दिपक भगत :- मार्च महिन्यापासुन देशभरात कोरोना या विषाणुजन्य आजाराने थैमान घातले असतांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातुन आतापर्यंत 4 लॉकडाउन घोषित करण्यात आले होते सद्यस्थितित 1 जून ते 30 जून पर्यंत लॉकडाउन सुरु आहे याचा उद्देश म्हणजे नागरिकांना कोरोनापासुन बचाव करणे होता मात्र सद्यस्थितित देशाच्या विविध राज्यातून चंद्रपुर जिल्ह्यात व शहरात प्रवाशांचे आवागमन सुरु असताना आतापर्यंत जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णापैकी 90% रुग्ण प्रवास करून आलेल्या पैकी असल्याचे दिसून येत आहे या अनुषंगाने चंद्रपुर शहर व जिल्ह्यात कोरोना चा प्रसार रोखण्याच्या दृष्टिने विविध उपाययोजना करणे व कायदा व सुव्यवस्था कायम राहन्याच्या दृष्टिने क्षेत्रीय स्तरावर अडचणी सोडविने व संबंधिताना प्रशासकीय स्तरावर आदेश देण्याकरिता मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांच्या आदेशानवये क्षेत्रीय स्तरावर उपविभागीय अधिकारी यांची इंसिडेंट कमांडर म्हणून नियुक्ति करण्यात आली आहे या अनुषंगाने ज्या क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्यास तो परिसर व सदर परिसरा जवळील इतर परिसर कंटेन्मेंट झोन घोषित करणे जेणेकरून इतर नागरिकांना कोरोनाची लागण होण्यापासुन वाचविता येवू शकेल, तत्काल प्रभावाने कंटेन्मेंट क्षेत्र घोषित करून सिमा बंद करून विविध उपाययोजना करण्याच्या दृष्टिने चंद्रपुर शहर महानगरपालिका क्षेत्राकरिता आयुक्त चंद्रपुर शहर महानगरपालिका, व चंद्रपुर शहर महानगरपालिका क्षेत्र वगळून सबंधित उपविभागीय अधिकारी यांना कंटेन्मेंट झोन निश्चित करून सिमा बंद करने व विविध उपाययोजना करण्याचे अधिकार प्रदान करण्यात येत असल्याची माहिती मा. जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी दिली आहे.
तसेच कोरोना संदर्भाने सबंधित उपविभागीय अधिकारी यांच्यासह सम्बंधित क्षेत्रातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, पोलिस निरीक्षक यांनी संयुक्त पाहणी अहवाल द्यावा अशा प्रकारच्या सूचना सुध्दा देण्यात आल्या आहेत.



0 Comments