बल्लारपुर नगर परिषदेची दंडात्मक कारवाई : मॉस्क न वापरने, सार्वजनिक ठिकाणी थूंकने व फुटपाथ वर दुकान लावणे पडले महाग !
बल्लारपुर(राज्य रिपोर्टर) दिपक भगत : कोरोनाच्या या विषाणुजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर व केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशाचे पालन न करने तसेच मा.जिल्हाधिकारी चंद्रपुर यांच्या 20 एप्रिल 2020 च्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक नागरिकाला सार्वजनिक व कामाच्या ठिकाणी मॉस्क वापरने बंधनकारक असतांना सुध्दा व वीणा मॉस्कशिवाय कोणताही नागरिक बाहेर फिरताना आढळून आल्यास सम्बंधित व्यक्ति कडून 200/- रु दंड वसूल करण्याचे आदेश आहेत या अनुषंगाने बल्लारपुर नगर परिषदेच्या वतीने विविध फिरत्या पथकाच्या माध्यमातुन कारवाई करण्यात आली आहे.
याविषयी च्या माहितीनुसार 23 व 24 जून 2020 ला विना मॉस्क घालून बाहेर फिरणाऱ्या 68 नागरिकावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
असून त्यांचेकडून 13,600/- रु दंड स्वरुपात वसूल करण्यात आले तसेच महात्मा गांधी संकुल जवळ रस्त्यावर फुटपाथ दुकानामुळे गर्दी वाढल्यामुळे वाहतुकीस बाधा निर्माण झाल्यामुळे फुटपाथवर लावलेल्या दुकाने हटविन्याची कारवाई अतिक्रमण पथक, नगर परिषद व पोलिस विभागाच्या सयुक्त कारवाईतुन करण्यात आली आहे तसेच फुटपाथवर दुकाने लावणाऱ्या 6 दुकानदारा कडून प्रत्येकी 500/- प्रमाणे 3000/- दंड वसूल करण्यात आला आहे.
तसेच रस्त्यावर भाजी व फळ विकणाऱ्याना महात्मा गांधी शाळेजवळ मोकल्या जागेत बसविन्यात आले या कार्रवाईच्या माध्यमातुन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बल्लारपुर शहर हॉटस्पॉट होवू नये त्यामुळे नागरिकांनी मॉस्कचा वापर करावा विनाकारण मॉस्कशिवाय रस्त्यावर फिरू नये सार्वजनिक ठिकाणी थुंकु नये तसेच सर्व दुकानदारानी रस्त्यावर वा फुटपाथवर आपले साहित्य ठेवू नये असे आवाहन मा.विपिन मुद्दा मुख्याधिकारी नगर परिषद बल्लारपुर यानी केले आहे.




0 Comments