बिना शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य द्या पिंपळगाव ग्राम वासियांचा टाहो
भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने तहसीलदार महेंद्र वाकलेकर साहेब यांना निवेदन सादर
चंद्रपूर,कोरपना (राज्य रिपोर्टर) : पिंपळगाव तसेच तालुक्यातील अनेक गावातील वंचित बीना शिधापत्रिकाधारकांना अन्नधान्य न मिळाल्यास रस्त्यावर उतरू श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष तालुका कोरपना यांचा इशारा कोरपना तालुका हा आदिवासी, गोरगरीब,दलित,शोषित,पीडित म्हणून ओळखला जातो कोरपना तालुक्यातील पिंपळगाव येथील स्थानिक रहिवाशी असलेले अनेक नागरिकांनी शासनाच्या आदेशानुसार बिना शिधापत्रिकाधारकांनी ग्रामपंचायतला आधार कार्ड व इतर कागद पत्र दिले परंतु दोन महिन्याचा कालावधी लोटून गेला तरीपण बोटावर मोजण्याइतक्या लोकांची नावे आली व खरे स्थानिक लाभार्थी यांचे नाव आलेच नाही आधीच covid-19 अंतर्गत लाकडावून असल्यामुळे अनेक जणांना या धान्यापासून वंचित राहावे लागले ग्रामपंचायतच्या चुकीच्या धोरणामुळे आजही अनेक लाभार्थी अन्नधान्यापासून वंचित आहे योग्य चौकशी करुण दोषीवर करवाही करावी व आम्हाला सात दिवसाच्या आत अन्नधान्य न मिळाल्यास रस्त्यावर उतरू व मोठ आंदोलन छेडू असा इशारा श्री नारायण हिवरकर भाजपा अध्यक्ष तालुका कोरपना तसेच बाबाजी हरिभाऊ बोबडे,विकास दुर्वे,विजय वाडगुरे,नरेश गुरनुले, विनोद मेश्राम आदी ग्रामवासी तसेच भाजप पदाधिकारी कार्यकर्त्यांनी निवेदन माननीय महेंद्र वाकलेकर तहसीलदार साहेब यांना देण्यात आले आहे.



0 Comments