राजुरा तालुक्यातील रामपूर, चुनाळा येथे दोघांची आत्महत्या


राजुरा तालुक्यातील रामपूर, चुनाळा येथे दोघांची आत्महत्या
 
राजुरा(राज्य रिपोर्टर) : राजुरा तालुक्यातील  रामपूर येथील ग्रामपंचायत मध्ये शिपाई या पदावर कार्यरत नीलकंठ लक्ष्मण निकोडे (वय ४५) यांनी आपले राहते घरी पहाटे ४ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. 
मागील काही दिवसांपासून नीलकंठ निकोडे हे मानसिक तणावात होते अश्यातच त्यांनी घराचे बाहेर झोपलेले असताना त्यांनी गळफास घेतली. त्यांच्या पच्छात एक मुलगा एक मुलगी, पत्नी व आई असा आप्तपरिवर आहे.

राजुरा तालुक्यातील   चुनाळा येथील शेतकरी गजानन गोपाळा कष्टी (वय ३५) यांनी आपल्या गोठ्यात सकाळी ११:३० वाजता विष घेऊन आत्महत्या केली .
गजानन कष्टी यांच्या नावे चार एकर शेती असून त्यांच्यावर सहकारी सेवा संस्थेचे ऐंशी हजार रुपये कर्ज होते, बियाणांची जुळवाजुळव करताना त्यांना आर्थिक अडचण निर्माण होत होती याच विवंचनेत सकाळी शेतात जाण्याच्या तयारीत असताना गोठ्यात कोणीही नसल्याचे पाहून कीटकनाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली. सायंकाळी ४ वाजता काही कामानिमित्य गोठ्यात गेलेल्या व्यक्तीला गजानन मृतावस्थेत दिसून आला. सदर घटनेची माहिती गावात पसरताच आर्थिक विवंचनेत असलेल्या गजानन बद्दल चुनाळा वासीयांनी हळहळ व्यक्त केली त्याच्या मागे पत्नी व दोन मुली आहे.

Post a Comment

0 Comments