राज्यातील वाढत्या जातीय अत्याचार थांबवा , पीडित्यांना योग्य न्याय देऊन आरोपींना कठोर शिक्षा द्यावी
भारतीय जनता युवामोर्चा विध्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार यांची मागणी
भारतीय जनता युवामोर्चा विध्यार्थी आघाडी तर्फे म.रा. मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे व म.रा. गृहमंत्री मा. अनिलजी देशमुख यांना निवेदन
राजुरा,(राज्य रिपोर्टर) राकेश कलेगुरवार : महाराष्ट्र राज्यात गेल्या काही महिन्यांपासून अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांवर जातीय कारणातून होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणामध्ये अधिक प्रमाणात वाढ झाल्याचे आढळून येत आहे. संपूर्ण देशात कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर ताळेबंदी व संचारबंदी लागू असून दरम्यान काळात जाती अत्याचाराचे प्रमाण वाढलेले आहे. नागपूर जिल्यातील नरखेड तालुक्यातील उच्च शिक्षित व दलित चळवळीचे कार्यकर्ते अरविंद बन्सोड यांना बेदम मारहाण करून त्याला कीटकनाशक औषधी प्राशन करून खून केल्याची घटना समोर आली. पुणे जिल्यातील पिंपरी चिंचवड, येथे आंतरजातीय उच्चवर्णीय मुलीशी प्रेमसंबंध असल्याने मुलीच्या नातेवाईकांनी विराज जगताप याला धारधार शस्त्रांनी वार करून अत्यंत निर्दयीपणे हत्या केली व पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, नागपूर, बीड ईत्यादी ठिकाणी अश्या घटनांमधून हत्याकांड देखील झालेले आहेत या सर्व बाबी लक्षात घेऊन आज दि. 16 जून 2020 रोज मंगळवार ला भाजयुमो विध्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष मोहन कलेगुरवार यांच्या नेतृत्वाखाली मा. तहसीलदारांमार्फत म.रा. मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे व म.रा. गृहमंत्री अनिलजी देशमुख यांना देण्यात आला त्यावेळी भाजयुमो वि.आ. राजुरा तालुका अध्यक्ष राहुल थोरात, तालुका महामंत्री छबिलाल नाईक, शहर अध्यक्ष सुधिर अरकिलवार, शहर महामंत्री अजयकुमार श्रीकोंडा,युवा नेता हरीश ब्राम्हणे प्रणय भोगा उपस्थित होते.




1 Comments
योग्य मागणी
ReplyDelete