शिवभोजन थाळी चंद्रपूर जिल्ह्यात मे महिन्यात 82 हजारांवर थाळींचे वाटप


गरजू नागरीकांचा आनंद शिवभोजन थाळी
चंद्रपूर जिल्ह्यात मे महिन्यात 82 हजारांवर थाळींचे वाटप
अख्या महाराष्ट्रात शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली
82 हजार 788 शिवभोजन थाळींचे  पॅक फूडद्वारे वाटप केले आहे.

चंद्रपूर,दि.10 जून(राज्य रिपोर्टर): राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची महत्वाकांक्षी शिवभोजन योजना यशस्वी ठरली आहे.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊन केले होते.परंतु या लॉकडाऊनच्या काळामध्ये अनेक बेघर,निराश्रित,विमनस्क नागरिकांची भुक शमविण्याचे काम शिवभोजन थाळीने केले. मे महिन्यात जिल्ह्यात तब्बल 82 हजार 788 शिवभोजन थाळींचे  पॅक फूडद्वारे वाटप केले आहे.

अख्या महाराष्ट्रात शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली आणि बघता बघता शिवभोजन थाळी नागरिकांच्या पसंतीला उतरली. कोरोना आपत्ती काळात फक्त 10 रुपयांना मिळणारी थाळी 5 रुपयाला मिळायला लागली. त्यामुळे गरजू नागरिकांना शिवभोजन थाळीचा आस्वाद घेता येत आहे.
राज्याचे मदत व पुनर्वसन आपत्ती व्यवस्थापनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.  विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नातून जिल्ह्यात कुणीही नागरिक उपाशी राहणार नाही.यासाठी आजमितीला 22 शिवभोजन केंद्रे चंद्रपूर शहर,तालुका स्तरावर सुरु करण्यात आले आहे.प्रत्येक गरजुबेघरगरीब,निराश्रित नागरिकांना चांगले आणि पोटभर जेवन मिळणे हा प्रमुख उद्देश शिवभोजन थाळीचा आहे.
जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र मिस्कीन व तालुकास्तरावरील पुरवठा विभागाचे कर्मचारी सर्व गरीबगरजू नागरिकांना शिवभोजन थाळी मिळावी यासाठी अविरत कार्य करीत आहे.
शिवभोजन थाळी वाटप करतांना विशेष खबरदारी:
कोरोनाचा वाढता प्रसार बघता शिवभोजन केंद्रावर थाळी वाटप करतांना विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.जेणेकरुन या काळात आजाराचा प्रसार होणार नाही.शारिरीक अंतर राखून नागरिकांना थाळींचे वाटप करण्यात येत आहे.नागरिकांची गर्दी होवू नये व शारिरीक अंतर राखल्या जावे यासाठी शिवभोजन थाळी पॅक फुडमध्ये वाटप करण्यात येत आहे.कोरोना विषयक जनजागृती व्हावी यासाठी शिवभोजन केंद्रावर मार्गदर्शक बॅनर,पोस्टर लावण्यात आले आहे.त्याचबरोबर,भोजन बनवितांना योग्य ती स्वच्छतेची,सुरक्षतेची काळजी घेतल्या जात आहे.नागरिकांसाठी सॅनीटायजर,हात धुण्याची व्यवस्था केलेली आहे.
स्वतंत्र शिवभोजन ॲप :
पुरवठा विभागाला याचा लेखाजोखा करता यावा यासाठी स्वतंत्र शिवभोजन अॅप सुरु करण्यात आली आहे.या अॅपद्वारे लाभार्थ्यांचे नांव,फोटो काढण्यात येतो.त्यामुळे दिवसाला किती थाळींचे वितरण झाले समजण्यास मदत होते. या अॅपमध्ये भोजनाचा दैनंदिन प्रकार टाकण्यात येतो.तसेच,भोजनाची गुवत्तेसंदर्भात लाभार्थी प्रतिक्रिया सुध्दा  नोंदवू शकतात.
असे आहे शिवभोजन थाळींचे वाटप:
मे महिन्यामध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये आगमन नामदेव सावजी भोजनालय, मयुर स्नॅक्स कॉर्नर, साईकृपा भोजनालय, सुकुन बिर्याणी सेंटर, वैष्णवी रेस्टॉरंट ॲड भोजनालय, विशाखा महिला बचत गट या केंद्रांनी एकूण 44 हजार 199 शिवभोजन थाळींचे वाटप केले आहे.
शिवशाही थाळी खानावळ बल्लारपुरज्योती कॅटरर्स राजुरासृष्टी कॅटरर्स समाधान फाउंडेशन चिमुर, शिवभोजन केंद्र ब्रम्हपुरीरवि खानावळ वरोरा,लकी सोशल क्लब सावलीफलके भोजनालय गोंडपिपरी, सादु बहुद्देशिय संस्था भद्रावतीमो. इकबाल खानावळ वरोरा,संजय कॅटरर्स ॲड सर्विसेस मुल, मातोश्री महीला बचत गट लोनवाही सिंदेवाहीपरमात्मा एक भोजनालय नागभीडविजय भोजनालय नागभीडरमा बाई महिला बचत गट घुग्गुस  चंद्रपूरमुस्कान हॉटेल पोंभुर्णादुष्यंत चायनिज रेस्टॅांरंट मुल या केंद्रांनी एकूण 38 हजार 589 शिवभोजन थाळींचे वितरण केले आहे.चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्र व तालुकाग्रामीण मिळून असे एकूण  82 हजार 788 थाळी  पॅक फूडद्वारे वाटप करण्यात आले आहे.
शिवभोजन केंद्राद्वारे सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत पॅक फूडचे वाटप करण्यात येत आहे.  शिवभोजन थाळी कोरोना प्रादुर्भावाच्या काळामध्ये विस्थापितगरीबगरजू नागरिकांसाठी उपयोगी ठरत आहे.

Post a Comment

0 Comments