2 कोटी 20 लाखाची रोकड पोलिसांनी पकडली सिरोंचा पोलीस
तेलंगणाच्या सिमेवरून महाराष्ट्रात आली रक्कम
पोलिसांनी ही दोन्ही वाहने ठाण्यात नेली.
सिरोंचा (राज्य रिपोर्टर): प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्राच्या सीमेत २ कोटी २० लाख रुपयांची रक्कम सिरोंचा पोलिसांनी पकडली. एमएच ३४, बीएफ ७२२१ या स्कॉर्पिओ वाहनातून संजय अवथळे (रा.आष्टी) आणि चालक सुधीर राऊत (रा.चंद्रपूर) हे तेलंगाना चे मंचिरियाल जिल्ह्यातून प्राणहिता नदीच्या पुलावरून महाराष्ट्रांच्या हद्दीत येत होते. यावेळी तेथील चेक पोस्टवर तैनात सिरोंचा पोलिसांच्या पथकाने वाहनाची तपासणी केली असता त्यात १ कोटी २० लाख रुपयांची रक्कम आढळली. हे वाहन आसरअली भागातील तेंदूपत्ता कंत्राटदाराकडे जात असल्याचे समजते.
दुसऱ्या कारवाई टीएस ११, पीएन ०००१ ही इनोव्हा गाडी गोदावरी नदीच्या पुलावरून महाराष्ट्राच्या हद्दीत पोहोचली असताना तेथील चेक पोस्टवर सिरोंचा पोलिसांच्या पथकाने गाडीची तपासणी केली. त्यात १ कोटी रुपयांची रक्कम आढळली. पोलिसांनी ही दोन्ही वाहने ठाण्यात नेली.
एसडीपीओ प्रशांत स्वामी यांच्या मार्गदर्शनेत ठाणेदार अजय अहीरकर यांच्यासह त्यांच्या पथकाने मंगळवारी गोदावरी आणि प्राणहिता नदीच्या पुलांवर करण्यात आली. रात्री उशिरापर्यंत रकमेची मोजणी आणि बयान नोंदणी सुरू होती.
रकमेची मोजणी आणि त्यातील इसमांचे बयाण घेणे रात्रीपर्यंत सुरू होते. पुढील कारवाई सिरोंचा पोलीस करत आहेत.





0 Comments