बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील आरोग्‍य संस्‍था अत्‍याधुनिक व उत्‍तम आरोग्‍य सेवा देणा-या ठराव्‍या – आ. सुधीर मुनगंटीवार


बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील आरोग्‍य संस्‍था अत्‍याधुनिक व उत्‍तम आरोग्‍य सेवा देणा-या ठराव्‍या – आ. सुधीर मुनगंटीवार

निधी मंजूरीसाठी सर्वतोपरी प्रयत्‍न करणार

झूम मिटींग द्वारे आ. मुनगंटीवार यांनी साधला अधिकारी व जिल्‍हा परिषद सदस्‍यांची संवाद

बल्लारपूर,(राज्य रिपोर्टर) : बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील उपजिल्‍हा रूग्‍णालये, ग्रामीण रूग्‍णालये तसेच प्राथमिक आरोग्‍य केंद्रे व उपकेंद्रे यांच्‍या माध्‍यमातुन उत्‍तम आरोग्‍य सेवा जनतेला पुरविण्‍याच्‍या दृष्‍टीने या आरोग्‍य संस्‍थांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्‍याच्‍या दृष्‍टीने आपण सार्वजनिक आरोग्‍य मंत्री राजेश टोपे, वित्‍त तसेच नियोजन विभागाचे सचिव यांच्‍याशी चर्चा केली असून यासाठी आवश्‍यक शासकीय विभागांच्‍या माध्‍यमातुन निधी उपलब्‍ध करण्‍यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्‍न करू. त्‍याचप्रमाणे भाजपाचे विविध राज्‍यसभा सदस्‍यांच्‍या स्‍थानिक विकास निधीच्‍या माध्‍यमातुन तसेच माझ्या आमदार निधीच्‍या माध्‍यमातुन निधी उपलब्‍ध करण्‍यात येईल. ग्रामीण भागात आरोग्‍य, शिक्षण, स्‍वच्‍छता व शेती या चार विषयांवर भर देत या भागातील नागरिकांना उत्‍तम आरोग्‍य सेवा देण्‍यासाठी आपण कटिबध्‍द असल्‍याची ग्‍वाही माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

बल्‍लारपूर विधानसभा क्षेत्रातील उपजिल्‍हा रूग्‍णालये, ग्रामीण रूग्‍णालये तसेच प्राथमिक आरोग्‍य केंद्रे व उपकेंद्रे यांचे आधुनिकीकरण व नूतनीकरण करण्‍याच्‍या दृष्‍टीने आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डीले, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, जिल्‍हा आरोग्‍य अधिकारी व प्राथमिक आरोग्‍य केंद्रांचे वैद्यकिय अधिकारी तसेच जिल्‍हा परिषद सदस्‍यांची झूम मिटींगद्वारे संवाद साधला. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्‍हणाले, या आरोग्‍य संस्‍था अत्‍याधुनिक व्‍हाव्‍या, रूग्‍णवाहीकांची सेवा उत्‍तम असावी, इमारतींचे बांधकाम, भौतिक साधनांची उपलब्‍धता, उपकरणे व यंत्रसामुग्री यासर्व बाबींनी या आरोग्‍य संस्‍था अद्यावत असल्‍या पाहीजे यावर भर देण्‍याच्‍या सूचना आ. मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना दिल्‍या. विशेषतः या आरोग्‍य संस्‍थांमधील वैद्यकिय अधिका-यांना विशेष प्रशिक्षण देत आरोग्‍य केंद्रांचे नूतनीकरण व आधुनिकीकरण करण्‍याच्‍या दृष्‍टीने येत्‍या सहा महिन्‍यात कार्यवाही अपेक्षीत असल्‍याचे ते यावेळी बोलताना म्‍हणाले.

यावेळी जिल्‍हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डीले यांनी सांगीतले की, यासंदर्भात दोन टप्‍प्‍यात अराखडा तयार करण्‍यात आला असून 54 कोटी 86 लाख रूपयांचा प्रस्‍ताव तयार करण्‍यात आला आहे. राष्‍ट्रीय आरोग्‍य अभियानाच्‍या प्राधान्‍य यादीनुसार इमारतींचे बांधकाम करता येईल तसेच मानव विकास निर्देशांकातील पोंभुर्णा व मुल या तालुक्‍यातील आरोग्‍य संस्‍थांशी संबंधित कामे त्‍या नियोजनातून करण्‍यात येईल. कोरोना विषाणूच्‍या प्रादुर्भावाचे संकट रोखण्‍याच्‍या दृष्‍टीने आयुर्वेदीक उपचारावर भर देण्‍यात येत असून आर्सेनिक अलबम 30 या गोळया, आयुर्वेदिक काढा या माध्‍यमातुन प्रतिकार शक्‍ती वाढविण्‍यावर भर देण्‍यात येत असल्‍याचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी यांनी सांगीतले. खनिज विकास निधीच्‍या माध्‍यमातुन 20 रूग्‍णवाहीका उपलब्‍ध करण्‍याबाबत प्रस्‍ताव सादर करण्‍यात आला असल्‍याची माहिती यावेळी राहूल कर्डीले यांनी दिली.

या झूम मिटींगदरम्‍यान जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले यांनीही या विषयासंदर्भात विस्‍तृत माहिती दिली. जिल्‍हा परिषद सदस्‍य रोशनी खान, पोंभुर्णा पंचायत समितीच्‍या सभापती अलका आत्राम, जिल्‍हा परिषद सदस्‍या वनिता आसुटकर यांच्‍यासह विविध प्राथमिक आरोग्‍य केंद्रांच्‍या वैद्य‍किय अधिका-यांनी समस्‍या सांगीतल्‍या. या समस्‍यांचे प्राधान्‍याने निराकरण करण्‍याच्‍या सूचना आ. मुनगंटीवार यांनी यावेळी दिल्‍या. 

Post a Comment

0 Comments