खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मदतीचा हात
खासदार धानोरकर, आमदार धानोरकरांच्या हस्ते धनादेश वितरित
वरोरा (राज्य रिपोर्टर): मागीलवर्षी नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची जनावरे दगावली होती. त्यांना जिल्हा परिषदेने नुकसानभरपाई मंजूर केली होती. खरीप हंगामाच्या तोंडावर जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची रक्कम देण्यात आली. खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते तालुक्यातील वीस शेतकऱ्यांना धनादेश देण्यात आले.
नैसर्गिक आपत्तीत तालुक्यातील वीस शेतकऱ्यांची जनावरे दगावली होती. पशूसंवर्धन विभागामार्फ़त नैसर्गिक आपत्तील मृत जनावरांचा प्रत्येकी सात हजार पाचशे रुपये मोबदला दिला जातो. मृत जनावरांच्या मालकांनी वरोरा पंचायत समितीकडे नुकसानभरपाई मिळण्याबाबत प्रस्ताव पाठविले होते. हे प्रस्ताव जिल्हा परिषदेने मंजूर केले. पंचायत समितीला अलीकडेच धनादेश प्राप्त झाले. नुकताच या धनादेशाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर, आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती रवींद्र धोपटे, उपसभापती संजिवनी मिलिंद भोयर, पंचायत समिती सदस्य विजय आत्राम, तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद भोयर,संवर्ग विकास अधिकारी संजय बोदिले, सहायक गटविकास अधिकारी संजय वानखेडे, तालुका पशूधन विकास अधिकारि आनंद नेव्हारे, डॉ. आकनुरवार यांची उपस्थिती होती. मुरर्लीधर भोंगळे, संजय गारघाटे, बंडू बदकी, हनुमान बदकी, प्रशांत जीवतोडे, पुरुषोत्तम बुराण, गणेश खूनकर, महेंद्र गारघाटे, दिवाकर दडमल, रेकचंद मुनोत, राम गोरे, महेंद्र मसाले, रामकृष्ण निखाडे, धनराज हक्के, गजानन टोंगे, मारोती पावडे, अशोक घोडाम, मधुकर क्षीरसागर, सुधाकर फुलझेले यांना मदतीचे धनादेश देण्यात आले.



0 Comments