पत्रकार,श्रमिक पत्रकारांना आर्थिक पॅकेज आणि विमा संरक्षण देण्यासाठी संघर्ष करणार - वसंत मुंडे

     पत्रकार,श्रमिक पत्रकारांना आर्थिक पॅकेज आणि विमा संरक्षण देण्यासाठी संघर्ष करणार - वसंत मुंडे 
विदर्भातील पत्रकारांशी साधला वेब संवाद.

 चंद्रपूर, (राज्य रिपोर्टर) : कोरोना फायटर बनून आरोग्य विभाग आणि पोलीस विभागा सोबतच प्रसार माध्यम  देखील महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत आहे.पत्रकारांसह माध्यमातील विविध घटकांना ,श्रमिक कामगारांना शासनाच्या माध्यमातून आर्थिक पॅकेज आणि विम्याचे कवच मिळवून देण्यासाठी राज्य पत्रकार संघ  राज्यव्यापी संघर्ष करेल,  पत्रकारांसह श्रमिक कामगारांना न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे अभिवचन
राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी दिले.
कोरोना संसग॔ परिस्थितीत लॉक डाऊन स्थिती असल्याने प्रत्येक जिल्ह्यातील पत्रकारांशी  महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे हे ऑनलाइन संवाद साधत आहेत. रविवार दिनांक 31 मे रोजी त्यांनी नागपूर विभागातील जिल्ह्यातील पदाधिकारी,तालुकाध्यक्ष आणि ग्रामीण भागातील पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी ग्रामीण भागातील पत्रकारांनी लॉक डाऊनमुळे ग्रामीण भागातील पत्रकारांवर मोठी आर्थिक बिकट परिस्थिती ओढवली असल्याने माध्यमातील प्रिंट व इलेक्ट्रॉनिक माध्यमातील पत्रकारांसह श्रमिक कामगारांचे महत् काय॔ लक्षात घेऊन शासनाने  आरोग्य आणि पोलीस कर्मचाऱ्यांपमाणे आर्थिक पॅकेज आणि विम्याचे संरक्षण त्याच धर्तीवर इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट माध्यमातील पत्रकार व श्रमिक कामगारांना देखील आर्थिक पॅकेजसह विम्याचे संरक्षण द्यावे अशी अपेक्षा असताना मात्र शासन या संदर्भात कोणताही निर्णय घेत नाही.त्यावर पत्रकार संघाने जबाबदारी घेऊन भूमिका पार पाडावी असे मत संवादात सामील पदाधिकारी यांनी  मत व्यक्त केले. यानंतर संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे म्हणाले की,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी पत्रव्यवहार करून पत्रकार आणि मीडियातील विविध घटका अंतर्गत येणारे श्रमिक कामगाराना आर्थिक पॅकेजसह विम्याचे संरक्षण देण्यात यावे अशी मागणी केलेली आहे.या मागणीला न्याय मिळेपर्यंत राज्य पत्रकार संघ आपला संघर्ष कायम ठेवेल.पत्रकार आणि श्रमिक कामगारानी देखील या कोरोना महामारीच्या लढाईत सर्व खबरदारी पाळून आपली नैतिक जबाबदारी पार पाडावी.असे भावनिक आवाहन प्रदेशाध्यक्ष मुंडे यांनी केले.या ॲप मिटींगचे यशस्वी आयोजन नागपूर विभाग प्रमुख महेश पानसे यांनी केले.या सोशल मीडिया ऑनलाईन मीटिंगमध्ये नागपूर,चंदपूर,भंडारा, गडचिरोली, जिल्हा अ्ध्यक्ष सर्व श्री सुनिल बोकडे,विक्कीभाऊ शेंडे,इरफान खान,रुपराज वाकोडेे,,सदाशि्व ढेंगे नागपूर विभाग उपाध्यक्ष प्रदिप रामटेके, सामील झाले होते.या वेब संवादात सातारा,,नंदुरबार,वासिम जिल्हा अ्ध्यक्ष यांनीही उपस्थिती लावली.या आनलाईन संवादामध्ये विदभा॔तील संघटनेचे तालुका   प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. ग्रामीणस्तरावरील पत्रकार मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. नागपूर विभागात पहिल्यांदाच सोशल ॲप द्वारे पत्रकार संघाच्या प्रदेशाध्यक्षांनी थेट ग्रामीण भागातील पत्रकारांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या बद्दल ग्रामीण पत्रकारातून समाधान व्यक्त करण्यात आले.
              या वेब संवादात सामील पत्रकार पदाधिकारी यांनी कोरोना विषाणू संसर्ग पाश्र्वभूमीवर संघटनेने कैलेल्या सामाजिक योगदानाचा गोषवारा सादर करुन पत्रकार,श्रमिक पत्रकार यांच्या समोरील समस्या राज्य आव्हाने प्रदेशाध्यक्ष यांचे समोर
ठेवून पत्रकारांचे पश्न शासन दरबारी रेटण्याचा आगॢह धरला.
         यापुढे सुद्धा वेब संवादाची शुंखला सुरू ठेवून संपर्कात राहण्याचा संकल्प उपस्थित पदाधिकारी यांनी सोडला.

Post a Comment

0 Comments