वरोरा वाहतूक सेने तर्फे मास्क वाटप
स्तुत्य उपक्रम - एक हजार मास्क चे वितरण
वरोरा : वाहतूक सेना शाखा वरोरा तालुक्याच्या वतीने 20 मार्च रोज शुक्रवार ला तालुका अध्यक्ष डॉ अमर सिंग यांच्या नेतृत्वात उपजिल्हा रुग्णालय वरोरा तसेच शहरातील विविध ठिकाणी मास्क चे वितरण करण्यात आले.
कोरोना व्हायरस हा विषाणूंचा एक गट आहे. या व्हायरसमुळे सस्तन प्राण्यांना आणि पक्ष्यांना विविध रोग होतात. यांत गायींना व डुकरांना होणाऱ्या अतिसाराचा आणि कोंबड्यांना होणाऱ्या श्वसन रोगाचा समावेश आहे. या विषाणूचा प्रसार मानवांमध्ये श्वसन संसर्गाने होतो. हे संसर्ग बऱ्याचदा सौम्य, परंतु संभाव्य प्राणघातक असतात. कोरोना व्हायरसचा प्रतिबंध करणारी लस किंवा रोग झाल्यास घ्यायची अँटिव्हायरल औषधे अजूनतरी (२०२० साल) उपलब्ध नाहीत. त्यामुळे हा रोग होऊच नये यासाठी स्वतः स्वताची घेणे महत्वाचे असल्याचे मनोगत यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता बोरकर यांनी व्यक्त केले .
यावेळी वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष सय्यद रब्बानी चिस्ती , जिल्हा कार्याध्यक्ष आशिक हुसेन , कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दत्ता बोरेकर, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष.शहर अध्यक्ष कंत्राटी कर्मचारी सेना बाळु रुयारकर , बंडू पाटेकर , सतीश गिरसावळे , खेमराज कुरेकार , प्रविण निलावार , रमेश शेंडे , त्रिशूल घाटे , अतुल वानखेडे , निलेश कुंभारे यांच्या सह वाहतूक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .



0 Comments