सुट्टी, कार्यालयीन कामकाजाबाबतचे केंद्राचे 'ते' परिपत्रक खोटे, सायबरकडून तपास जारी शासनाकडून आवाहन, अफवांवर विश्वास ठेवू नये

सुट्टीकार्यालयीन कामकाजाबाबतचे
केंद्राचे 'तेपरिपत्रक खोटेसायबरकडून तपास जारी
शासनाकडून आवाहनअफवांवर विश्वास ठेवू नये
मुंबईदि. 13 : कोरोना विषाणुला अटकाव करण्याच्या दृष्टीने सुट्टी आणि कार्यालयीन कामकाजाबाबत समाजमाध्यमांवरून प्रसारित होत असलेले परिपत्रक खोटे आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात येत आहे.
केंद्रीय आरोग्य आणि कुटंब कल्याण मंत्रालयाकडून निर्गमित करण्यात आलेले परिपत्रक असे भासवूनया परिपत्रकात सुट्टी व कार्यालयीन कामकाजाबाबतचे तसेच दंडाच्या तरतुदीबाबत खोटी माहिती पसरविण्यात येत आहे.  वस्तूतः त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. हे परिपत्रक खोटे आहेअशा कुठल्याही सूचना केंद्र शासनाने दिलेल्या नाहीत. यासंदर्भात शासनाने गंभीर दखल घेतली असूनयाबाबत सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्याबाबत तपास सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता राज्यशासन वेळोवेळी देत असलेल्या सूचनाच ग्राह्य मानाव्यातअसे आवाहनही करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments