अन्न व औषध प्रशासन यांचे नियंत्रण कक्ष स्थापन
मुंबई, दि. 25: कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेली स्थिती लक्षात घेता औषध वितरण नियमित ठेवणे आणि उत्पादन सुरळीत ठेवण्यात येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी अन्न व औषध प्रशासनाने नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. हा नियंत्रण कक्ष अन्न व औषध प्रशासनाच्या मुख्यालयात श्री. सुनील भारद्वाज, पोलिस अधिक्षक तथा सह आयुक्त (दक्षता) यांच्या नियंत्रणात सुरु राहणार आहे.
सध्या जगात/देशात/राज्यात कोरोना विषाणूचा वाढत्या प्रादुर्भावामुळे भयावह स्थिती निर्माण झालेली आहे. या परिस्थितीत जनतेला सर्व आवश्यक औषधे नियमित उपलब्ध होणे अत्यंत आवश्यक आहे. औषध वितरण व उत्पादन हे अत्यावश्यक सेवेमध्ये मोडले जाते. मात्र औषध वितरण नियमित ठेवणे व औषध उत्पादन सुरळीत सुरु ठेवणे यासाठी अडचणी निर्माण होत आहेत. या अडचणींचे तत्परतेने निराकरणासाठी संबंधितांनी काही अडचणी आल्यास नियंत्रण कक्ष दूरध्वनी क्र. १८००२२२३६५ ०२२-२६५९२३६२/६३ या क्रमांकावर संपर्क साधावा.



0 Comments