शेतकऱ्यांनी शेतामध्ये मृदा व जलसंवर्धन करावे : डॉ. उषा डोंगरवार
एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम
चंद्रपूर, : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई,विभागीय कार्यालय नागपूर जिल्हा चंद्रपूर आणि कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही यांच्या संयोगाने एक दिवसीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे (धान पीक परिसंवाद) आयोजन दिनांक 6 मार्च 2020 रोजी कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथे पार पडला. या प्रशिक्षणामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील 60 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सहयोगी संशोधन संचालक कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही डॉ. उषा डोंगरवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही डॉ.व्ही.जी नागदेवते, प्रमुख अतिथी म्हणून मुख्य प्रबंधक (विपणन) आरसीएफ नागपुर एम. एच. पटेल तसेच विषयतज्ञ (गृह विज्ञान)कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही स्नेहा वेलाटे, विषयतज्ञ (विस्तार) डॉ. व्ही.एन.सिडाम, अधिकारी (विपणन) चंद्रपूर एम.जे. देशमुख हे प्रामुख्याने उपस्थित होते.
सहयोगी संशोधन संचालक कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही डॉ. उषा डोंगरवार यांनी उद्घाटन प्रसंगी, शासनाच्या कृषीविषयक विविध योजनांची माहिती दिली. त्याचबरोबर मृदा व जलसंवर्धन करणे गरजेचे आहे व शेतकऱ्यांनी पिकांना उर्वरकांची संतुलित मात्र कशी द्यावी याविषयी सांगितले.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी धान व सोयाबीन शेती उत्पादन वाढविण्याचे मार्गदर्शन, कार्यक्रम समन्वयक कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही डॉ.व्ही.जी नागदेवते यांनी केले. कृषी विषयक विविध योजना तसेच आरसीएफच्या उत्पादनाविषयी माहिती मुख्य प्रबंधक (विपणन) आरसीएफ नागपुर एम. एच. पटेल यांनी उपस्थितांना दिली.
विषयतज्ञ (गृह विज्ञान) कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही स्नेहा वेलाटे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ द्वारे बनवलेल्या शेती संदर्भातील विविध उपकरणे विषयी माहिती शेतकऱ्यांना दिली. विषयतज्ञ (विस्तार) डॉ. व्ही.एन.सिडाम यांनी मार्गदर्शनात, शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीने माती नमुन्या विषयी सांगितले. आरसीएफ उत्पादित उत्पादना संदर्भात माहिती तसेच विविध रासायनिक खतांविषयी सविस्तर माहिती, अधिकारी (विपणन) चंद्रपूर एम.जे. देशमुख यांनी शेतकऱ्यांना दिली. प्रशिक्षण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अधिकारी (विपणन) चंद्रपूर एम.जे. देशमुख यांनी केले.



0 Comments