मतदार यादीसंदर्भात दावे व हरकती सादर करण्‍याचे आवाहन

मतदार यादीसंदर्भात दावे व हरकती
सादर करण्‍याचे आवाहन
चंद्रपूर  : 13 मार्च रोजी सर्व मतदार केंद्रावर मतदान याद्या पुनरिक्षण उपक्रमांतर्गत सादर केल्या जाणार आहेत त्यामुळे मतदार यादीसंदर्भात दावे व हरकती असल्यास त्याचा स्वीकार 13 मार्च 2020 ते 15 एप्रिल 2020 या काळात करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.
मतदान यादीमध्ये आपले नाव आहे अथवा नाही, यासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला होता. या कार्यक्रमांतर्गत 29 फेब्रुवारी पर्यंत मतदार पडताळणी कार्यक्रम अंतर्गत नोंदणी करण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या याद्या प्रारुप स्वरूपात सर्व संबंधित मतदार केंद्रावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी मतदारांनी मतदार यादीत आपल्या नावाची अचूक नोंद असल्याची खात्री करावी. नावांची अचूक नोंद नसल्यास या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांच्या कार्यालयात दिनांक 13 मार्च ते 15 एप्रिल या कालावधीत दावे व हरकती सादर करावे, असे आवाहन उपजिल्हा निवडणूक अधिकारी चंद्रपूर यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments