चिचपल्ली येथे अन्नदिन साजरा

चिचपल्ली येथे अन्नदिन साजरा

चंद्रपूर,  : अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत धान्य वितरणाची सुधारित पद्धत निर्धारित करून दिलेली आहे. त्या अनुषंगाने संपूर्ण राज्याकरिता महिन्याच्या 7 तारखेला अन्नदिन व दिनांक 8 ते 15 या तारखेत अन्न सप्ताह साजरा करण्यात यावा तसेच या दिवशी गावातील चावडी, रास्त भाव दुकान सार्वजनिक याठिकाणी उपस्थित असलेल्या दक्षता समिती सदस्य व इतर स्थानिक लोकांच्या उपस्थितीत धान्याचे वितरण करण्यात यावे असे निर्देश आहेत.
गावातील शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण व्हावे यासाठी चिचपल्ली येथील अशोक दुर्योधन यांच्या रास्तभाव दुकानात दिनांक 7 मार्च रोजी अन्नदिन साजरा करण्यात आला. या अन्नदिनी  उपसरपंच सोना निमगडे, ग्रामपंचायत सदस्या आशा दुर्योधन, वैशाली डोर्लीकर व इतर सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. यांचे उपस्थितीत   एकूण 36 अंत्योदय शिधापत्रिकाधारक व 40 प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारक यांना धान्य वितरण करण्यात आले. 

Post a Comment

0 Comments