आवश्यक गरजाकरिताच बाहेर पडावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल

बल्लारपुरकराना प्रशासनाचे आवाहन आवश्यक गरजाकरिताच बाहेर पडावे अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल
दिपक भगत/बल्लारपुर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या विषाणुजन्य रोगाचा प्रसार होवू नये या उद्देशाने व केंद्रसरकार व राज्यशासनाच्या सूचनेनुसार सोमवार 30 मार्च 2020 पासून बल्लारपुर शहरातील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की नागरिकांनी आपल्या अत्यावश्यक कार्याकरिताच बाहेर पडावे अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल याशिवाय बल्लारपुर शहरातील गोल पुल ते कॉलरी मार्गावर तसेच राज्यमहामार्गावर बसणाऱ्या सब्जिविक्रेता यांना आवाहन करण्यात येत आहे की त्यानी आपल्या वार्ड परिसरात सब्जी विकण्याचे कार्य करावे तसेच नागरिकांनी आपल्या आवश्यक गरजा किराणा, दूध, व सब्जी भाजी आपल्या जवळच्या दुकानातून खरेदी करावे तसेच ओषधी सुद्धा आपल्या जवळच्या मैडिकल मधून खरेदी करावी नागरिकांनी सदर वस्तु खरेदी करतांना कोणत्याही प्रकारच्या वाहनाचा वापर करू नये तसेच विनाकारण शहरात फिरणाऱ्या नागरिकाचे वाहन जप्त करून दंडात्मक कारवाई करण्यात येईल त्यामुळे नागरिकांनी सद्यास्थितित आपल्या घरातच राहून सहकार्य करण्याचे आवाहन नगर परिषद बल्लारपुर च्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments