राजुरा नगर परिषदेचा रैन बसेरा ठरतोय निराधारांसाठी आधार.
चार व्यक्ती आणि एका चिमुकलीची प्रशासनाने केली सोय.
लाॅकडाऊन मध्ये अडकलेल्या व्यक्तींची माहिती देण्याचे आवाहन.
चार व्यक्ती आणि एका चिमुकलीची प्रशासनाने केली सोय.
लाॅकडाऊन मध्ये अडकलेल्या व्यक्तींची माहिती देण्याचे आवाहन.
राजुरा : नगर परिषद राजुरा द्वारा झाकीर हुसेन प्राथमिक शाळा न. प. राजुरा येथे लाॅकडाऊन मुळे अडलेले निराधार व्यक्तींच्या राहण्याची, खाण्याची, आरोग्याची व्यवस्था म्हणून रैन बसेऱ्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. आज संपूर्ण दिवसभरात वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आलेले पाच व्यक्तींची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. यात मारोती डोंगरे राहणार सोईत तालुका वरोरा, गयाबाई कोडापे राहणार विहिरगाव, उस्मान अली, नाजिया अली आणि चिमुकली जोरा अली राहणार कानपूर, उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे.
राजुऱ्यात अडकून पडलेल्या निराधार, असहाय्य व्यक्तींबद्दल जागृक नागरिकांनी माहिती उपलब्ध करून दिल्यास आम्ही अशा व्यक्तींची रैन बसेऱ्यात राहण्या, खाण्याची व वैद्यकीय संपूर्ण व्यवस्था करून देऊ असे आवाहन नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले तर लाॅकडाऊन काळात नागरिकांना येणाऱ्या अडचणी ताबडतोब प्रशासनाला कडविण्याचे आवाहन नगर परिषद, महसूल विभाग, पोलीस विभाग, वैद्यकीय विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.
या प्रसंगी नगराध्यक्ष अरुण धोटे, मुख्याधिकारी आर्शीया जुही, तहसीलदार डॉ. रवींद्र होळी आणि नगर परिषद, महसूल विभाग, पोलीस विभाग व आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.



0 Comments