पोंभुर्णा तालुक्यातील कोसंबी रिठ येथे लवकरच एमआयडीसी

पोंभुर्णा तालुक्यातील कोसंबी रिठ येथे
लवकरच एमआयडीसी
- उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. 12 : चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील मौजे कोसंबी येथील संपादीत होणा-या जमिनीचा मोबदला शेतक-यांना वाटप करून 10.75 हेक्टर जागेचा ताबा महामंडळास प्राप्त झालेला आहे. काही स्थानिकांचा विरोध असल्याने उर्वरित जमिन संपादीत करण्यास अडथळे निर्माण होत आहेत. उर्वरित क्षेत्रासाठी सामंजस्याने तोडगा काढण्याचा शासन  प्रयत्न करीत असूनतसे न झाल्यास नियमाप्रमाणे मोबदला देऊन जमीन अधिग्रहीत करून पुढील पंधरा दिवसात कार्यवाही सुरू करून लवकरच एमआयडीसी अस्तित्वात येईल, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई  यांनी विधानसभेत दिली.
सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी कोसंबी रिठ येथील संपादीत शेतजमिनींचा मोबदला शेतक-यांना देण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्यास उत्तर देताना मंत्री श्री.देसाई बोलत होते.
मंत्री श्री.देसाई म्हणालेकोसंबी रिठ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळासाठी जमिन संपादन सुरू आहे. संपादित होणाऱ्या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना वाटप करून १०.७५  हेक्टर जागेचा ताबा महामंडळास प्राप्त झालेला आहे.
सलगतेने उपलब्ध होणा-या उर्वरित क्षेत्रासाठी मोबदला वितरण करण्यात येईल. मात्रयासाठी स्थानिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. स्थानिक गावकरी सहकार्य करीत नसल्याने पाणीवीज अशा पायाभुत सुविधा देणे कठीण जात आहे.
स्थानिकांनी सहकार्य न केल्यास नियमाप्रमाणे जमीनीचा मोबदला देऊन जमिन  अधिग्रहीत करण्यात येईल. पुढील पंधरा दिवसात एमआयडीसीसंदर्भातील काम सुरू करण्यात येईल आणि लवकरच एमआयडीसी अस्तित्वात येईल अशी माहिती मंत्री श्री.देसाई यांनी यावेळी दिली.
याचबरोबर रायगड जिल्ह्यातील मौजे चाळ येथील महामंडळाने पाणीपुरवठा योजनेसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या संदर्भात सदस्य प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नास उत्तर देताना मंत्री श्री.देसाई म्हणालेएमआयडीसीने तळोजा पाणीपुरवठा येाजनेसंदर्भात संबंधित खातेदारांना १९९४ पर्यंतचे वार्षिक भू-भाडे अदा केले आहे. उर्वरित खातेदारांना शीघ्र गणकानुसार पुढील तीन महिन्यात भाडे देण्यात येईल. जमिन अंतिमत: भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहितीही मंत्री देसाई यांनी दिली.

Post a Comment

0 Comments