राज्यातील कारागृहात सीसीटीव्ही लावणार

राज्यातील कारागृहात सीसीटीव्ही लावणार
- गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई, दि. 12 : राज्यातील प्रत्येक कारागृहात ‘सी सी टीव्ही’ लावणार असून यासाठी 90 कोटी रुपयांची योजना तयार करण्यात आली असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगितले.
            श्री. देशमुख म्हणाले,  कारागृहातील बंदी यांनी प्रतिबंधीत वस्तू कारागृहात नेऊ नये यासाठी प्रत्येक व्यक्तीवस्तू व वाहनांची तपासणी व कसून झडती  घेण्यात येते. त्यासाठी मेटल डिटेक्टर डोनर फ्रेम मेटल डिटेक्टर या साधनांचा वापर करण्यात येता. याबरोबरच राज्यातील सर्व कारागृहातील सुरक्षा यंत्रणा अधिक चांगली व्हावी यासाठी येत्या सहा महिन्यात सिसिटीव्ही ची यंत्रणा उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या विषयाच्या अनुषंगाने सदस्य सर्वश्री रामहरी रुपनवरडॉ. रणजीत पाटीलजयंत पाटीलसुरेश धस आदिंनी प्रश्न उपस्थित केला होता.

Post a Comment

0 Comments