मराठी चित्रपटसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेता हरपला

ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांच्या निधनाने
चतुरस्त्र अभिनेता हरपला
-उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबईदि. 17 ज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीतील चतुरस्त्र अभिनेता हरपलाअशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोकभावना व्यक्त केल्या.
उपमुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात कीज्येष्ठ अभिनेते जयराम कुलकर्णी यांनी मराठी नाटकसिनेमात कसदार अभिनय केला. ग्रामीण ढंगातग्रामीण भाषेत संवाद साधण्याची त्यांची कला महाराष्ट्रात लोकप्रिय होती. विशेषतः त्यांनी साकारलेला कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी कधीही विसरता येणार नाही. शिस्तप्रिय अभिनेता अशी त्यांची ओळख होती. त्यांचा अभिनयमराठी नाटकचित्रपट सृष्टीसाठी त्यांनी दिलेलं योगदान महाराष्ट्राच्या सदैव स्मरणात राहील.

Post a Comment

0 Comments