आरोग्याचा त्रास जाणवल्यास तज्ञांच्या मार्गदर्शनाने
औषधोपचार घ्यावा : डॉ.आयझॅक मिन्झ
डब्ल्यू.एच.ओचे विभागीय समन्वयकांची जिल्ह्याला भेट

चंद्रपूरदि. 19 मार्च : हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीमेची पडताळणी करण्याकरिता जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय समन्वयक डॉ.आयझॅक मिन्झ तसेच पी.सी.आय संस्थेचे राष्ट्रीय कार्यक्रम व्यवस्थापक रंगपाल सिंगजिल्हा समन्वयक महेश झारकर यांनी दिनांक 13 मार्चला जिल्ह्यास भेट दिली. भेटीदरम्यान शहरी विभागात विद्या विहार कॉन्व्हेंट तुकुमसैनिक शाळा चंद्रपूर तसेच ग्रामीण विभागात चिचपल्ली येथील हत्तीरोग औषधोपचार घेतलेल्या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
सदर चमने कार्यक्रमाचे  नियोजनाविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोतचंद्रपूर महानगरपालिकेचे उपायुक्त गजानन बोकडेप्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ.कीर्ती राजूरवारजिल्हा हिवताप अधिकारी डॉ.अनिल कुकडपवारहत्तीरोग अधिकारी डॉ.एस.पी.कापूरे यांचेशी  चर्चा केली व जिल्ह्यामध्ये उपाययोजना विषयी माहिती घेतली .
जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय समन्वयक डॉ.आयझॅक मिन्झ यांनी सैनिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शनातहत्तीरोग तसेच कोरोना (कोविड-19) याविषयी सविस्तर माहिती दिली. आरोग्याचा त्रास जाणवल्यास त्वरित तज्ञांचे मार्गदर्शनाने औषध उपचार घ्यावा,असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून साधा सर्दी,खोकला ताप असल्यास घाबरू नका. परंतु,शिंकताना खोकताना तोंडावर रुमाल ठेवावा असे सांगितले. या प्रसंगी सैनिक शाळेचे प्राचार्य  स्क्वॉड्रन लीडर नरेश कुमार प्रामुख्याने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments