कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाचा निर्णय : देशभरातील रेल्वे सेवा 31 मार्च पर्यंत बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाचा निर्णय : देशभरातील रेल्वे सेवा 31 मार्च पर्यंत बंद

दिपक भगत/बल्लारपुर :- आज कोरोना वायरस ने संपूर्ण जगभरात धूमाकूळ घातला असून  चीन च्या वुहान प्रांतातुन सुरु झालेल्या कोरोना वायरस ने चीन व इटली देशात अनेक नागरिक मृत्यु मुखी पडले आहेत भारतात या कोरोना चा प्रसार मोठ्या प्रमाणावर होवू नये म्हणून केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातुन अनेक उपाय योजना करण्यात येत आहे तसेच या वायरस चा प्रसार होवू नये म्हणून भारताचे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून 22 मार्च 2020 ला  जनता कर्फ्यू ची आवाहन करण्यात आले आहे भारतात कोरोना वायरस ने 341 लोक प्रभावित असून देशभरात सद्य स्थितीत 10 नागरिकांचा मृत्यु झाला आहे .
           या कोरोना वायरसचा प्रसार मोठ्या प्रमाणावर होवू नये म्हणून केंद्र व राज्य सरकारनी जीवनावश्यक सेवा वगळता सर्व सेवा 31 मार्च 2020 पर्यंत बंद करण्याचे आदेश दिले आहे यासोबतच भारतीय रेल्वे च्या जारी केलेल्या निवेदना नुसार देशभरातील रेल्वे सेवा, सोबतच दिल्ली मेट्रो, मुंबई मेट्रो व कोलकाता मेट्रो सह कोकण रेल्वे सुध्दा 31 मार्च 2020 पर्यंत स्थगित (रद्द) करण्यात आल्या आहेत विशेष बाब म्हणजे रेल्वेची मालवाहतुक सेवा ही सुरळीत राहणार आहे. रेल्वे प्रशासनाचे सदर आदेश आज सायंकाळी 4:00 वाजता पासून लागू होणार असून सदर आदेश 31 मार्च 2020 ला रात्री 24:00 वा पर्यत लागू राहणार आहे या सोबतच या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना प्रसार माध्यमाच्या (इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडियाच्या) माध्यमातुन कळविन्याचे आवाहन सुध्दा रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments