मा. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात बल्लारपुर शहरात जवळपास 2000 पेक्षा जास्त नागरिकांना मोफत भोजनदान





बल्लारपूर विधानसभेचे आमदार विकास पुरुष  
मा. सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात बल्लारपुर शहरात लगत 6 ते 7 दिवसांपासून जवळपास 2000 पेक्षा जास्त नागरिकांना मोफत भोजनदान
बल्लारपुर : कोरोना या जीवघेण्या आजारापासुन अनेकांचे रोजगार हिरावले गेले याशिवाय अनेक गोरगरीब व दक्षिण भारतातून आपल्या स्वगावी जाण्या करिता वाटेत असणाऱ्या नागरिकांना बल्लारपुर शहरात मा.आमदार सुधिरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात मागील 6 ते 7 दिवसांपासून जवळपास 2000 नागरिकांना मोफत जेवणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे याशिवाय बल्लारपुर शहराच्या विविध भागात भिक्षेकरी म्हणून जीवनयापन करणाऱ्या नागरिकांची सोय सुद्धा करण्यात आली आहे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्वासित असणारे नागरिकाना सुध्दा भोजनाची सोय  करण्यात आली आहे याकरिता भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व बल्लारपुर नगर परिषदेचे अध्यक्ष हरीश शर्मा यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते दिवसरात्र कार्यरत असून कुणीही उपाशी पोटी राहु नये म्हणून झटत आहेत. 
       आज संपूर्ण जग कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणुजन्य आजाराने ग्रस्त असताना भारताला या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमानावर होवू नये म्हणून केंद्र सरकार व राज्यशासनाच्या सूचनेनुसार बल्लारपुर शहरात स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अनेक प्रकारच्या उपाययोजना करण्यात येत आहे व कोणताही नागरिक मूलभूत गरजांपासुन वंचित राहु नये याची दखल घेण्यात येत आहे  या आणीबाणी च्या परिस्थितीत बल्लारपुर शहरात असणाऱ्या नावलोकिक असणाऱ्या काही सामाजिक संघटना नदारद आहे की काय असा प्रश्न निर्माण होत आहे निवडणुकीच्या वेळी निर्माण होणार अनेक राजकीय पक्षाचे पुढारी सुद्धा सक्रियपणे नागरिकांची मदत करतांना दिसून येत नाही. 
          ज्यांच्यावर आपली नितांत श्रद्धा असते ते लॉकडाउन झाले असताना मानवरूपी देव सध्या डॉक्टर, नर्स, पोलिस, पत्रकार, व जीवनावश्यक गरजांची पूर्तता करणाऱ्या प्रत्येक मानवात दिसून येत आहे व या सर्वांची मदत राजकारणाच्या पलीकडे जावुन प्रत्येक भारतियाने करणे ही आजची काळाची गरज आहे तरी येणाऱ्या पुढील काळात बल्लारपुर शहरातील सक्रियपने कार्यरत असणाऱ्या विविध सामाजिक संघटना व विविध राजकीय पक्ष माणूसकिला मदत म्हणून राजकारणापुढे जावुन कार्य करतील अशी अपेक्षा बल्लारपुरकरानी केली आहे.

Post a Comment

0 Comments