जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता
सकाळी 11 ते सायंकाळी 5 यावेळेतच सुरू राहतील
सकाळी 11 ते सायंकाळी 5 यावेळेतच सुरू राहतील
चंद्रपूर, दि.24 मार्च : राज्यामध्ये संचारबंदी लागू झाली असून जिल्ह्यामध्ये सुद्धा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहे. यादरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. यापूर्वी सकाळपासून सुरू राहणारी जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आता फक्त 11 ते 5 या काळातच सुरू राहणार आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरिता प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. जेणेकरून कोरोना विषाणूंचा वाढता प्रभाव आटोक्यात येईल. चंद्रपूर जिल्ह्यात सद्यस्थितीत सुरू असलेल्या जीवनावश्यक वस्तू विक्री व वितरण जसे भाजीपाला, किराणा सामान, दूध, ब्रेड, फळे, अंडी, मांस, मत्स्य, बेकरी, पशुखाद्याची दुकाने यासर्व आस्थापना दुकाने दिनांक 24 ते 31 मार्च या कालावधीत सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू राहतील.
आस्थापना, दुकानदार यांनी आपले आस्थापनेवर, दुकानात एका वेळेस दोन पेक्षा जास्त व्यक्ती हजर राहणार नाहीत.याची दक्षता घ्यावी.तसेच दोन ग्राहकांमध्ये 1 मीटरचे अंतर ठेवावे. त्याकरिता आस्थापना, दुकाने यासमोर 1 मीटर अंतरावर मार्किंग करावी. त्याचप्रमाणे त्यांनी सॅनीटायझर, साबणाने हात धुण्याची व्यवस्था असावी.
सदर आदेशाचा भंग झाल्यास व एखादी आस्थापना, दुकाने दिलेल्या वेळेनंतर सुरू राहिल्यास संबंधित आस्थापना, दुकानदार यांचेविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005, साथरोग प्रतिबंधक कायदा 1897,भारतीय दंड संहिताचे कलम 188, 269, 270, 271 अन्वये कार्यवाही करण्यात येईल.
या सेवा सुरू राहतील :
बँका, एटीएम, विमा, फिनटेक सेवा आणि संबंधित क्रिया, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक माध्यम, दूरसंचार, टपाल, इंटरनेट आणि डेटा सेवांसह आयटी आणि अत्यावश्यक वस्तूंची पुरवठा साखळी व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक,कृषीमाल आणि उत्पादने वस्तूंची निर्यात आणि आयात, अन्न, औषध व वैद्यकीय उपकरणासह आवश्यक वस्तूंचे ई-कॉमर्सद्वारे वितरण, खाद्यान्न वस्तू, किराणा सामान, दूध, ब्रेड, फळे, भाज्या, अंडी, मांस, मासे यांची वाहतूक व साठवन, पाळीव प्राण्यांसाठीचे खाद्यपदार्थ व पशुवैद्यकीय सेवा तसेच बेकरी,घरपोच पार्सल सेवा देण्यासाठी रेस्टॉरंट्स सुरू राहू शकतात,
रुग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक, पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑइल एजन्सी, त्यांची गोदाम आणि संबंधित वाहतूक कार्य,
अत्यावश्यक सेवा करिता खाजगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षा सेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था.
रुग्णालये, औषधालये आणि चष्म्याची दुकाने, औषधांचे कारखाने, विक्रेते आणि वाहतूक, पेट्रोल पंप, एलपीजी गॅस, ऑइल एजन्सी, त्यांची गोदाम आणि संबंधित वाहतूक कार्य,
अत्यावश्यक सेवा करिता खाजगी संस्थांमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुरक्षा सेवेसह अन्य सेवा देणाऱ्या संस्था.
राज्य सरकारची विभाग, कार्यालये व सेवा देणारी सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम केवळ आवश्यक सेवा प्रदान करण्याच्या मर्यादेपर्यंत कार्यरत असतील.
शासकीय कर्मचारी हे अत्यावश्यक सेवेत मोडत असून वेगवेगळ्या आस्थापना व अतिशय मर्यादित अशा लोकांना काम करायला सांगण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षासाठी व जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपले ओळखपत्र दर्शनी भागात ठेवून गळ्यात ओळख पत्र टाकून ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
दरम्यान पत्रकार व वृत्तपत्रांसाठी, विविध वाहिन्यांसाठी तसेच केबल नेटवर्कसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना, वृत्तपत्र विक्रेत्यांना आपले ओळखपत्र दाखवून कामावर येता येणार आहे. पोलिसांना यासंदर्भात सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनमार्फत गेल्या असून ज्या कर्मचाऱ्यांची सेवा अत्यावश्यक सेवा म्हणून गणल्या जाते त्यांना या काळात सूट देण्यात आली आहे. तथापि ,ज्यांना सूट दिली आहे त्यांनी आपल्या कर्तव्य बजावण्यासाठी या सुविधेचा वापर करावा ,असे आवाहन देखील पोलीस विभागाने केले आहे.


0 Comments