एलपीजी LPG गॅस दरवाढ व गॅस तुटवड्याविरोधात बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेसचे आंदोलन
◾घरगुती गॅस सिलेंडर ६० रुपये तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ११५ रुपयांनी वाढ
बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : केंद्र सरकारने एलपीजी गॅसच्या दरात अचानक वाढ करून महागाईत होरपळून निघालेल्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.
घरगुती गॅस सिलेंडर ६० रुपये तर व्यावसायिक सिलेंडरच्या दरात ११५ रुपयांनी वाढ केली आहे. दरवाढीसोबतच गॅस बुकिंगचा कालावधीही वाढवला आहे. प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने हॅाटेल बंद होत आहेत. ही दरवाढ अन्यायकारक असून तात्काळ मागे घ्यावी तसेच घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर ग्राहकांना सहज उपलब्ध करून द्यावे.
केंद्रातील सरकारकडे गॅस व इंधन पुरवठ्याचे कोणतेही नियोजन नाही, त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे. आखाती युद्धामुळे गॅसचा तुटवडा जाणवत आहे. गॅससाठी रांगा लावाव्या लागत आहेत, हॉटेल व्यवसाय, खाणावळी बंद करण्याची वेळ आली आहे. गॅसचा तुटवडा नाही हा सरकारचा दावा चुकीचा असून सर्वसामान्य जनता व हॉटेल व्यावसायीक यांना गॅस उपलब्ध होत नाही. आधीच महागाई त्यात गॅसचा तुटवडा यामुळे राज्यात कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने एलपीजी गॅस पुरवठा सुरळीत करावा या मागणीसाठी बल्लारपूर शहर व तालुका काँग्रेस कमेटी चे नेते, पदाधिकारी, सेल, विभागाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले आंदोलनानंतर माननीय तहसीलदार मार्फत केंद्र सरकार ला नेविदेन देण्यात आले.
आंदोलनात प्रामुख्याने नगर परिषद अध्यक्षा डॉ. अलका ताई वाढई, वरिष्ठ नेत्री डॉ. रजनी ताई हजारे, तालुका अध्यक्ष गोविंदा उपरे, तालुका महिला अध्यक्षा अफसाना सैय्यद, शहर अध्यक्ष अब्दुल करीम, युवक कांग्रेस अध्यक्ष नरेश गंडलपल्ली, माजी नगराध्यक्ष दिलीप मकोडे, माजी नगराध्यक्षा सुनंदा आत्रम, माजी नगराध्यक्षा छाया मडावी, माजी उपाध्यक्ष डॉ. सुनील कुलदीवार ,नासिर खान,भास्कर मकोडे, नगरसेविका करुणा रेब्बावर,वैशाली हुमने, अंकू बाई बुक्या, प्रियंका थुलकर, वैष्णवी जुमडे, शिल्पा चूटे, बल्लारपूर नगरविकास आघाडी के भारत थूलकर, डॉ. अनिल वाढई,सिनेट सदस्य दीपक धोपटे, नरसिंग रेब्बावर , अनिल खरताड, डेव्हिड कामपेल्ली , मीडिया अध्यक्ष कासीम शेख, डॉ. भासारकर, नाना बुंदेल,महमूद पठाण, एॅड. सैय्यद प्रीतम पाटील, अनिल मार्शेट्टीवर, अजय दुपारे, हेमंत मानकर,वासुदेव येरगुडे, नरेश बुरांडे, शंकर आलम,राजू मेश्राम,वर्षा दानव,साबिर शेख, नौशाद शेख, फारुक शेख,संजू मादोत,हरीश पवार, मोहसिन इराणी,रवी वेले, फारुक खान, राशिद शेख,अस्लम शेख,अन्सार शेख, अजित पडवेकर, शंकर माने व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.







0 Comments