बल्लारपूर शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या विरोधात पत्रकार राहुल गायकवाड यांचे अन्नत्याग आंदोलन 17 मार्च पासून

 




बल्लारपूर शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या विरोधात पत्रकार राहुल गायकवाड यांचे अन्नत्याग आंदोलन 17 मार्च पासून

◾शासनाच्या महसुलाला झालेल्या मोठ्या नुकसानाची चौकशी व्हावी 



बल्लारपूर,( राज्य रिपोर्टर न्युज ) : बल्लारपूर शहरातील वाढत्या अतिक्रमणाच्या विरोधात तसेच शासनाच्या महसुलाला झालेल्या मोठ्या नुकसानाची चौकशी व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते राहुल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आंदोलन करण्यात येत आहे.

हे आंदोलन दिनांक 17 मार्च रोजी दुपारी 11 वाजता तहसील कार्यालयासमोर सुरू होणार आहे.

या आंदोलनाला शिवसेना (शिंदे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांनी जाहीर समर्थन दिले आहे.

प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे :

1. शहरातील वाढत्या अतिक्रमणावर तात्काळ कारवाई करून ते हटवण्यात यावे.

2. शहरातील 31 बट्टे जमीन या ठिकाणी बिल्डरने केलेल्या अतिक्रमणामुळे महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला असून या प्रकरणाची सीआयडी मार्फत सखोल चौकशी करण्यात यावी.

3. विसापूर जवळील 69 बट्टे जमीन, जी विनोबा भावे यांच्या आंदोलनातून भूमिहीनांना देण्यात आली होती, ती बिल्डरांनी कोट्यवधी रुपयांना विक्री करून शासनाचा मोठा महसूल बुडवला आहे. या प्रकरणाचीही सीआयडी चौकशी करण्यात यावी.

4. पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार वाढत असून, संपूर्ण चौकशी होईपर्यंत पत्रकारांवर गुन्हे दाखल करू नयेत.

5. पत्रकार रमेश निषाद यांना जीवे मारण्याची धमकी देऊन अश्लील शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात लावलेली आयपीसी कलमे रद्द करून पत्रकार सुरक्षा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात यावी.

6. सुरजागड येथून मोठ्या प्रमाणात चालणाऱ्या वाहनांची वाहतूक तात्काळ बंद करण्यात यावी.

वरील मागण्यांवर शासनाने तात्काळ कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.





Post a Comment

0 Comments